बिहारमध्ये गेम पलटणार? नितीश कुमार भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता; अद्याप सस्पेन्स
Nitish Kumar News : एनडीएविरोधात इंडिया आघाडीकडून देशभरातील सर्वच घटकपक्षांची वज्रमूठ बांधण्यात आली आहे. आगामी निवडणुका उंबरठ्यावर ठेपल्या असून अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जींनी एकला चलो रे चा नारा दिला. त्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही (Nitish Kumar) पलटी मारणार असल्याचं बोललं जात आहे. कुमार भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.
नितीश कुमार यांच्याबाबत अंदाज लावणे अवघड असलं तरीही त्यांनी दिलेले संकेत खूप काही सांगून जातात. बिहारच्या राजकारणात ते महाआघाडीचं सरकार चालवताना दिसतात खरे पण त्यांचा कल भाजपकडेही असल्याचं दिसून येत आहे. भाजपकडूनही नितीश कुमारांसाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसतंय. यावर बोलताना नितीश कुमारांनी थेटपणे भाष्य केलं आहे. आपण राज्याच्या हिताचा कोणताही निर्णय घेणार असल्याचं नितीश कुमारांनी स्पष्ट सांगून टालकलं आहे. नितीश कुमार यांनी भाजपकडे अनेक मागण्या केल्या होत्या. त्यातील काही मागण्या मान्य झाल्याच्या मार्गावर आहेत.
“सपने नहीं हकीकत बुनते है”.. थीम साँग लाँच करत भाजपाची निवडणूक प्रचारात उडी
पंतप्रधानांचे आभार मानले…
नितीश कुमार अनेक दिवसांपासून केंद्राकडे दोन मागण्या करत आहेत. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची त्यांची मागणी आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली. नितीश यांनी एक्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारबद्दल कृतज्ञतेचा उल्लेख होता, मात्र मोदींचे नाव नव्हते. काही वेळातच त्यांनी तो मेसेज डिलीट करून सुधारित मेसेज पोस्ट केला, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. त्यांच्या या वाटचालीकडे नरेंद्र मोदींचा कल म्हणून पाहिले जात आहे.
बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी नितीश वारंवार करत आहेत. विशेष दर्जा मिळण्यात तांत्रिक अडचणी आहेत हेही त्यांना माहीत आहे. बिहारला विशेष दर्जा देण्याऐवजी केंद्र सरकार नितीश यांना खूश करण्यासाठी मोठे पॅकेज देऊ शकते, अशी शक्यता आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान त्यांच्या प्रस्तावित दौऱ्यात याची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर भाजपचा नैतिक विरोध करण्याचे धाडस नितीशकुमारांना जमणार नाही. एका विश्वसनीय सूत्रानुसार, ही माहिती नितीश कुमार यांनाही देण्यात आली आहे, जेणेकरून ते महाआघाडीतून बाहेर पडण्याची आपली भूमिका तयार करू शकतील. त्यामुळे त्याच्यावर पक्षांतर करण्याच्या आरोपालाही काही अर्थ उरणार नाही.
जायचं होतं गोव्याला पण नवऱ्यानं घडवली ‘अयोध्या’; ‘हनीमून’ फेल झाल्याने पत्नीने मागितला घटस्फोट
पीएम मोदींसोबत फोटो सेशन
नितीश कुमार यांना सुरुवातीला नरेंद्र मोदींबद्दल आदर वाटला नसेल, पण आता ते त्यांचे प्रशंसक बनल्याचे दिसते. G-20 बैठकीत त्यांनी पंतप्रधानांसोबत फोटो सेशन केले. मोदी ज्याप्रमाणे राजकारणात घराणेशाहीला विरोध करत आहेत, त्याच धर्तीवर नितीश यांनी कर्पुरी जयंती सोहळ्यातही हल्ला चढवला. नितीश बिहारमध्ये आरजेडीकडे बोट दाखवत होते. राजदचे लालू यादव यांचे संपूर्ण कुटुंब राजकारणात आहे. आता लालूंची कन्या रोहिणी आचार्य यांना राजकारणात आणण्याची तयारी सुरू आहे. नितीश यांचाही सुरुवातीपासून विरोध आहे. कर्पूरी ठाकूर यांचे नाव घेऊन ते म्हणाले की, मी नेहमीच त्यांच्या कुटुंबाला राजकारणात आणण्याच्या विरोधात असतो.
दरम्यान, भविष्यात राज्याच्या हिताचाच निर्णय घेणार हे त्यांचे विधान हे राजद आणि विरोधकांना मैत्रीचे दीर्घकाळ पाहुणे नसल्याचे स्पष्ट संकेत आहे. त्यांच्या या विधानामुळे बिहारमध्ये नवे राजकीय समीकरण आकार घेऊ शकते. तर दुसरीकडे अमित शाह यांनी दिल्लीत बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता नितीश कुमार नेमकी कोणती भूमिका घेणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.