जायचं होतं गोव्याला पण नवऱ्यानं घडवली ‘अयोध्या’; ‘हनीमून’ फेल झाल्याने पत्नीने मागितला घटस्फोट

जायचं होतं गोव्याला पण नवऱ्यानं घडवली ‘अयोध्या’; ‘हनीमून’ फेल झाल्याने पत्नीने मागितला घटस्फोट

Bhopal News : लग्न होऊन फक्त पाच महिने झाले होते. नवविवाहित जोडप्याने हनिमूनला जाण्याचा बेत केला. हनिमूनसाठी गोव्याला (Goa) घेऊन जाईन असं वचन पतीने पत्नीला दिलं होतं. पण, घडलं भलतंच. पतीने पत्नीला थेट अयोध्या (Ayodhya) आणि वाराणसीला नेलं. मग काय नाराज झालेल्या पत्नीने माघारी परतल्यानंतर पतीला थेट फॅमिली कोर्टातच खेचलं आणि घटस्फोटाची मागणी केली. असा हा किस्सा आता चर्चेत आला आहे.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) पिपलानी येथील रहिवासी दाम्पत्याने ऑगस्ट 2023 मध्ये लग्न केले होते. महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिचा पती आयटी कंपनीत नोकरीला असून पगारही चांगला मिळतो. महिला सुद्धा चांगली कमाई करते. मग विदेशात जाणे काही फार अवघड नव्हते. मात्र महिलेचा पती तिला वाराणसी आणि अयोध्या येथे घेऊन गेला. आता हे प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आले. कोर्टात दोघांनी दिलेल्या वक्तव्यांनुसार, आई वडिलांच्या देखभालीचे कारण पुढे करून पतीने परदेशात जाण्याचा प्लॅन रद्द केला. भारतातच कुठेतरी फिरून येऊ असा प्रस्ताव पतीने पत्नीसमोर ठेवला. त्याला पत्नीने सहमती दिल्यानंतर गोवा आणि दक्षिण भारतात जाण्याचे नक्की करण्यात आले.

Ram Mandir चं उद्घाटन अन् गर्भवती मातांची अनोखी मागणी; अयोध्येतील अजब प्रकार

प्रत्यक्षात मात्र पतीने वाराणसी आणि अयोध्येसाठी तिकीट बूक केले. कारण, पतीच्या आईची राम मंदिर प्राणप्रतिष्ठेआधी अयोध्येत जाण्याची इच्छा होती. या नव्या प्लॅनिंगची माहिती पतीने आदल्या दिवशी दिली. परंतु, त्यावेळची परिस्थिती पाहून पत्नी शांत राहिली. ट्रिपवरून आल्यानंतर मात्र दहा दिवसांनंतर पत्नीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

पती माझ्यापेक्षा त्याच्या कुटुंबातील सदस्यांची जास्त काळजी घेतो असे पत्नीने या अर्जात म्हटले. दुसरीकडे पतीने सांगितले की त्याची पत्नी विनाकारण वाद निर्माण करत आहे. कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आहे. यानंतर फॅमिली कोर्टाच्या वकिलांकडून नवविवाहित जोडप्याचे समुपदेशन केले जात आहे. आता यानंतर दोघांत समेट होईल का, दोघांचा आताच सुरू झालेला संसार टिकेल का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. परिसरात या अजब प्रकाराची मोठी चर्चा सुरू आहे.

अबब! नाशिकमध्ये तब्बल 20 कोटी लिटर पाणी वाया; नदीत ड्रग्ज शोधण्याच्या नादात पोलिसांचा प्रताप

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज