पुणे पोलिसांची मध्यप्रदेशमध्ये धडाकेबाज कारवाई! पिस्तूलचे कारखाने उध्वस्त करत दारूगोळा जप्त
Pune Police यांनी मध्य प्रदेशात जाऊन पिस्तूल बनवण्याचे कारखाने उध्वस्त केले. यामध्ये त्यांनी पिस्तूलसह मोठा दारूगोळा जप्त केला.
Pune Police conducts a massive operation in Madhya Pradesh Pistol factories are demolished and ammunition is seized : पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन धडाकेबाज कारवाई केली आहे. याठिकाणी त्यांनी पिस्तूल बनवण्याचे कारखाने उध्वस्त केले. यामध्ये त्यांनी पिस्तूलसह मोठा दारूगोळा जप्त केला. मध्य प्रदेशमधील उमरती गावात शिरून पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये 47 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
T20 World Cup 2026 मध्ये भिडणार भारत- पाकिस्तान; ‘या’ दिवशी होणार सामना
शुक्रवारी मध्यरात्री केलेल्या या कारवाईचं नेतृत्व पुणे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी केलं. त्यांच्यासोबत या मिशनवर तब्बल 105 पोलिसांचा फौजफाटा होता. तर मध्य प्रदेशमधील उमरती गावात उद्धस्त केलेल्या या चार कारखान्यांमध्ये 100 हून अधिक गन बॅरल 5 मॅक्झिन, 14 ग्रेडिंग मशीन्स, 2 पिस्तुलं, 4 काडतुसं जप्त करण्यात आले आहेत. तसेच या कारखान्यातील तब्बत 48 कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे लोक या कारखान्यांमध्ये बेकायदेशीर हत्यारं बनवत होते.
https://x.com/LetsUppMarathi/status/1992140151649362329
दरम्यान पुणे पोलिसांच्या महाराष्ट्राबाहेरील या कारवाईसाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसरीकडे मात्र पुण्यामध्ये मात्र गेल्या काही दिवासांत प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे. त्याता कोयता गॅंगने देखील डोकेवर काढले आहे. याच कोयता गॅंगने पुण्यातील डेक्कनमध्ये रेस्टॉरंट आणि बारवर कोयत्याचा धाक दाखवत मध्यरात्री दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेचे हादरवून सोडणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
