“सपने नहीं हकीकत बुनते है”.. थीम साँग लाँच करत भाजपाची निवडणूक प्रचारात उडी

“सपने नहीं हकीकत बुनते है”.. थीम साँग लाँच करत भाजपाची निवडणूक प्रचारात उडी

Lok Sabha Election 2024 : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या तीन (Ayodhya Ram Mandir) दिवसांनंतर भाजपाने लोकसभा निवडणुकांची मोहिम सुरू केली आहे. भारतीय जनता पार्टीचे (Lok Sabha Election 2024) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रचार मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी एक खास थीम साँगही लाँच करण्यात आले. ‘सपने नहीं हकीकत को बुनते है, तभी तो सब मोदी को चुनते है’, असे या गाण्याचे शब्द आहेत. या व्हिडिओत उज्ज्वला गॅस योजना, डीबीटी, प्रत्येक घरात नळाने पाणी, प्रधानमंत्री आवास योजना यांसह सरकारच्या परराष्ट्र धोरणांचे यशस्वी चित्रण करण्यात आले आहे.

सोलापूर लोकसभा : वर्तुळ पूर्ण करण्यासाठी प्रणिती शिंदे सज्ज, भाजपची शोधमोहिम पुन्हा सुरु!

यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आगामी निवडणुकीसाठी भाजपाच्या जाहीरनाम्यात कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत यासाठी नागरिकांची मते मागितली. पुढील 25 वर्षात आपले स्वतःचे आणि देशाचे भवितव्य निश्चित करायचे आहे. राज्य, जिल्हा, केंद्र पातळीवर होणाऱ्या निवडणुकीत युवकांवर मोठी जबाबदारी असेल असे मोदी म्हणाले. 1947 पासून 25 वर्षे आधी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची जबाबदारी जशी युवकांच्या खांद्यावर होती त्याचपद्धतीने आता 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची जबाबदारी सुद्धा युवकांवर आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन पद्धतीने युवावर्गाला संबोधित केले. भूतकाळात भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या हेडलाइन असायच्या आता मात्र विश्वसनीयता आणि यशोगाथेच्या चर्चा होत आहेत. तुमची स्वप्न हाच माझा संकल्प आहे, हीच मोदींची गॅरंटी आहे, असे पीएम मोदी म्हणाले.

पीएम मोदी स्वप्ने सत्यात आणतात – जेपी नड्डा 

भाजपाने हे गाणे फर्स्ट टाइम व्होटर्स कॉन्क्लेव्हमध्ये रिलीज केले. आता हे गीत देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जा असे आवाहन भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले. पीएम मोदी स्वप्नांना सत्यात आणतात. मागील पिढी, आताची पिढी आणि भविष्यातील पिढींची स्वप्ने पूर्ण करण्याची गॅरंटी मोदी देतात. त्यांनी 500 वर्षांचे देशवासियांचे स्वप्न पूर्ण करून दाखवल्याचे जेपी नड्डा म्हणाले.

Ayodhya : राम मंदिर आंदोलनात मोठं योगदान देणाऱ्या उमा भारती-साध्वी ऋतंभरा ढसाढसा रडल्या

भाजपाच्या या निवडणूक प्रचाराचे अनेक टप्पे असतील. या मोहिमेचे थीम साँग आज रिलीज करण्यात आले. पुढील काही दिवसांत पार्टी डिजिटल होर्डिंग्ज, बॅनर आणि डिजिटल चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन करत आहे. निवडणूक प्रचारात पीएम मोदींनी जी आश्वासने दिली ती पू्र्ण केली हे लोकांना सांगण्यावर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube