सर्व्हेचं नाटकच, सरकार क्रूर पद्धतीने खेळतंय; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत आव्हाडांचा घणाघात

सर्व्हेचं नाटकच, सरकार क्रूर पद्धतीने खेळतंय; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत आव्हाडांचा घणाघात

Jitendra Awhad News : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा चांगलाच गाजत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये काहीही माहिती नसणाऱ्या कर्मचाऱ्याला सर्व्हेसाठी बसवण्यात आलं आहे असा तो व्हिडीओ आहे. हा व्हिडिओ शेअर करीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर घणाघात केला आहे. सर्व्हेचं नाटक करुन सरकारच मराठा बांधवांच्या भावनांशी क्रूरपणे खेळत असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केलीयं.

जितेंद्र आव्हाड पोस्टमध्ये म्हणाले, “हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात खरच गंभीर आहे का..? कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही, सगळा फॉर्म डिजिटल असताना त्याला मोबाईल वापरता येत नाही, सर्व्हे नेमका कशासाठी चाललं आहे, याचच त्याला ज्ञान नाही, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तो या कामासाठी पुरेसा शिक्षित नाही.
एकीकडे लक्षावधी मराठा बांधव त्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले असताना, ते मुंबईकडे कूच करत असताना देखील हे सरकार सर्व्हेचा असा फार्स निर्माण करत असेल तर मराठा आरक्षण संदर्भात ते किती गंभीर आहेत,हे लोकांच्या आता लक्षात येतं” असल्याचं आव्हाड पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

कथित खिचडी घोटाळा प्रकरण : संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना ईडीचं समन्स

“आरक्षण देणार ते कसे देणार..? ओबीसी मधून देणार की इतर कोणत्या कोट्यातून देणार.? इतर कोट्यातून दिले तर ते कोणत्या प्रकारे देणार..? या मूळ प्रश्नांवर हे सरकार काहीच बोलत नाही.उलट असे सर्व्हे चे नाटक करून लाखो मराठा बांधवांच्या भावनांशी हे सरकार क्रूर पद्धतीने खेळत आहे.आणि हा प्रकार आपल्या या राज्याचा हिताचा नाही,हे मी निक्षून सांगू इच्छितो” असंही ते म्हणाले आहेत.

‘काहीही हरकत नाही’: मराठा-ओबीसी वादात मध्यस्थी करण्याची आंबेडकरांची ऑफर जरांगेंनी स्वीकारली

दरम्यान, मराठा आरक्षणावरून राज्यात रान पेटलेले असताना अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा समाजाचं मागासलेपण शोधण्यासाठी मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षणाचे (Maratha Survey) काम हाती घेण्यात आले आहे. या सर्वक्षणासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांना देखील नियुक्त करण्यात आले आहे. मात्र या सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कर्मचारी हे अशिक्षित, अप्रशिक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात तर एक पहिली पास व्यक्ती या सर्वेक्षण करत असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे नगरमध्ये मराठा सर्वेक्षणाचा फज्जा उडाला असल्याचे समोर आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube