Maratha Reservation : मराठ्यांचं आरक्षण कसं कमी झालं? फडणवीसांनी ‘स्टार्ट टू एन्ड’ सांगितलं

Maratha Reservation : मराठ्यांचं आरक्षण कसं कमी झालं? फडणवीसांनी ‘स्टार्ट टू एन्ड’ सांगितलं

Devendra Fadnvis On Maratha Reservation Bill : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाकडून विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकानूसार मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. याआधी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, अधिवेशनात आज 10 टक्क्यांवर आलं आहे. आरक्षणाच्या या आकडेवारील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी थेट भाष्य करत स्टार्ट टू एन्ड सांगितलं आहे.

OBC Reservation : ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर कोर्टात खेचू’; ओबीसी नेत्यांचा सरकारला स्पष्ट इशारा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयाने या आरक्षणावर आक्षेप नोंदवत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी 13 टक्के आरक्षण दिलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणात त्रुटी काढून रद्द केलं होतं. त्यावर चीफ जस्टीस भोसलेंची समिती नेमली.

Chatrapati Shivaji Maharaj जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे क्षणचित्रे

या समितीच्या माध्यमातून त्रुटींवर अभ्यास करुन दूर केल्या. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने राज्यभर सर्वेक्षण करण्यात आलं आहे. राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक लोकांच्या घरोघरी जात सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानंतर आयोगाने अहवाल दिला अन् अहवालानंतरच आज अधिवेशनात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या पाहणीतून त्यांनी ज्या प्रकारचा निकाल दिला. त्यानुसार आजचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. शेवटी आपल्याला आरक्षणाची टक्केवारी ठरवताना ती खबरदारी घ्यावी लागतं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

धक्कादायक! ‘एसीपी’साठी एक लाखांची लाच घेणारा जाळ्यात; ‘लाचलुचपत’ची धाडसी कारवाई

नोकरभरतीच्या जाहीरातीत मराठा समाजाला वेगळ्या जागा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारने मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण देण्याबाबतचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. आता हे विधेयकाच्या मंजुरीनंतर कायदा मंजूर होणार आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या सरकारी नोकरीच्या जाहीरातींमध्ये मराठ्यांसाठी वेगळ्या जागा निघणार असून त्याचा मराठा तरुणांना फायदा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज