Chatrapati Shivaji Maharaj जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे क्षणचित्रे

Chatrapati Shivaji Maharaj : आज (सोमवार, 19 फेब्रुवारी) ला अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांची ३९४ वी जयंती आहे.

शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shind) यांच्या उपस्थित हा शिवजयंती सोहळा साजरा झाला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा झाला.

या उत्सवानिमित्त शिवजन्मस्थान, शिवकुंज, शिवदेवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गडाचे दरवाजे फुलांच्या माळांनी सजवले होते. सकाळी शिवाई देवीची शासकीय महापूजा करण्यात आली.

दरम्यान, शिवजयंतीसाठी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवभक्त शिवनेरी गडावर दाखल झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषाने संपूर्ण गडावर जयघोष झाला.
