धक्कादायक! ‘एसीपी’साठी एक लाखांची लाच घेणारा जाळ्यात; ‘लाचलुचपत’ची धाडसी कारवाई

धक्कादायक! ‘एसीपी’साठी एक लाखांची लाच घेणारा जाळ्यात; ‘लाचलुचपत’ची धाडसी कारवाई

ACB Trap in Pune : पोलीस दलात लाचखोरीची परंपरा कायम आहे. खाकी वर्दीतील या घटना (Pune Police) समोर येत असतात. आताही अशीच एक घटना समोर आली असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहाय्ययक पोलीस आयुक्त (एसीपी) मुगुटलाल पाटील यांच्यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यातील एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ओंकार भरत जाधव या व्यक्तीला पकडले. एसीबीच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रार दिलेल्या व्यक्तीविरुद्ध कात्रज-कोंढवा बायपास रोड येथील जागेबाबत फसवणुकीचा अर्ज एसीपी पाटील यांच्याकडे आला होता. या प्रकरणाची चौकशी पाटील करत होते. यामध्ये फसवणुकीचा गु्न्हा दाखल होऊ नये यासाठी एसीपी पाटील यांच्या सूचनेवरून पाच लाख रुपये लाच मागितली गेली, अशी तक्रार तक्रारदाराने जाधव याच्याविरुद्ध दिली होती.

Pune News : ‘टास्क फ्रॉड’च्या जाळ्यात पुणेकर; तब्बल 27 कोटी रुपये गमावले

यानंतर एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली. यामध्ये जाधवने एसीपी पाटील यांच्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर या लाचेतील एक लाख रुपयांचा हप्ता घेताना त्याला पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस दलात याच घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

ओंकार भरत जाधव हा पुण्यातील वाकड येथील रहिवासी आहे. त्याने देहूरोडच्या एसपींसाठी पुणे शहरातील एका हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये ही लाच स्वीकारली. त्याने एसीपी पाटील यांच्यासाठी तक्रारदाराकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती हे पडताळणीत समोर आले आहे.

पुणे हादरले ! दुकानमालकावर गोळ्या झाडल्या; नंतर सराफ व्यावसायिकाची रिक्षामध्येच आत्महत्या !

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज