पुणे हादरले ! दुकानमालकावर गोळ्या झाडल्या; नंतर सराफ व्यावसायिकाची रिक्षामध्येच आत्महत्या !

  • Written By: Published:
पुणे हादरले ! दुकानमालकावर गोळ्या झाडल्या; नंतर सराफ व्यावसायिकाची रिक्षामध्येच आत्महत्या !

killed one and shot the accused and committed suicide पुणेः
पुणेः मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या व आरोपीची आत्महत्येच्या घटनेस दोन दिवस होत नाही तेच पुण्यातही तशीच घटना घडली आहे. आर्थिक वादातून एकावर गोळीबार करून आरोपीने स्वतः वर पिस्तूलमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. आरोपी हा पोलिस ठाण्यात रिक्षाने येत असताना मध्येच त्याने स्वतःला संपविले आहे. पुण्यातील (Pune) औंध परिसरात शनिवारी सायंकाळी ही घटना घडलीय.

Paytm Crisis: विजय शेखर शर्मा! अब्जाधीश ते दिवाळखोरपर्यंतचा प्रवास

अनिल सखाराम ढमाले (वय 52 रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोळीबारात आकाश गजानन जाधव (वय 39 रा. बाणेर) हे गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ढमाले हे सराफ व्यवसायिक आहे. तर आकाश जाधव हे दुकानमालक आहेत. जाधव यांचे बाणेर येथील हाय स्ट्रीटवरील दुकान हे ढमाले यांच्याकडे गेल्या 14 वर्षापासून भाड्याने आहे.

Narayan Rane : माझ्यावर टीका करतो, एक दिवस चोप देणार; भास्कर जाधवांना थेट नारायण राणेंची धमकी !


एकाच दुचाकीवरून जात होते पण…

शनिवारी सायंकाळी आकाश जाधव व अनिल ढमाले हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी पाठीमागे बसलेल्या अनिल ढमाले याने आपल्याकडील पिस्तूलमधून आकाश जाधववर गोळ्या झाडल्या. त्यात जाधव हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर अनिल ढमाले याने पळ काढला. त्यानंतर एका रिक्षातून तो चतु:शृंगी पोलीस ठाण्याकडे जात होता. भाले चौकातून जात असताना ढमाले याने स्वतःकडील पिस्तूलमधून डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.

रिक्षाचालकाने लगेच ही माहिती फोनवरून पोलिसांना दिली आहे. बाणेर भागातील एका सोसायटीजवळून तो व्यक्ती रिक्षात बसला होता. त्याला चतु:शृंगी पोलिस ठाण्यात जायचे होते, असे रिक्षाचालकाने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिस घटनास्थळी आले असून, त्यांनी चौकशी सुरू केली आहे.

चिठ्ठीही सापडली !

अनिल ढमाले यांच्याकडे एक चिठ्ठी सापडली आहे. आता मला पर्याय नाही, म्हणून मी हा निर्णय घेत असल्याचे ढमाले यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आढळले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज