मॉरिसच्या डोक्यात अभिषेक घोसाळकरांबद्दल राग; म्हणायचा, ‘मी त्याला संपविणारच’, मॉरिसच्या पत्नीचा जबाब

  • Written By: Published:
मॉरिसच्या डोक्यात अभिषेक घोसाळकरांबद्दल राग; म्हणायचा, ‘मी त्याला संपविणारच’, मॉरिसच्या पत्नीचा जबाब

Morris Noronha: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळक (Abhishek Ghosalkar) यांची गुरुवारी दहिसरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने तातडीने घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरू केला. गेल्या काही तासांत गुन्हे शाखेने वेगाने तपास वेगाने तपास करून अनेक बाबी समोर आणल्या. या सगळ्यात मॉरिस नोरोन्ह याच्या पत्नीने दिलेला जबाब महत्वाचा ठरला. मॉरिसच्या पत्नीच्या साक्षीवरून असे दिसते की, मॉरीसनने आधीच अभिषेक घोसाळकरांना मारण्याचा कट रचला होता.

चौधरी चरणसिंह, नरसिंह राव आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा 

ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून घोसाळकर यांची हत्या केली. या नंतर मॉरिसच्या पत्नीने गुन्हे शाखेच्या युनिट 11 च्या अधिकाऱ्यांसमोर साक्ष दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, मॉरिस हा बलात्काराच्या एका प्रकरणात पाच महिने तुरुंगात होता. मॉरिसचा असा विश्वास होता की अभिषेक घोसाळकरने आपल्याला बलात्काराच्या प्रकरणात अडकवलं होतं. काही दिवसांपूर्वीच मॉरिसची जामिनावर तुरुंगातून सुटका झाली होती. मात्र, तरीही त्याला अभिषेक घोसाळकरांबद्दल राग होता, असं मॉरिसच्या पत्नीने सांगितलं.

त्या पुढं म्हणाल्या की, घरात असतांना मॉरिस अनेकदा म्हणायचा, ‘मी अभिषेकला सोडणार नाही, मी त्याला संपवणारच, असं मॉरिसच्या पत्नीनं सांगितलं. मॉरिसच्या पत्नीने दिलेली ही माहिती तपासातील महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता आहे. आहे. दरम्यान, मॉरिसच्या पत्नीला पुन्हा साक्ष देण्यासाठी पोलिस बोलावण्याची शक्यता आहे. यापुढील काळात पोलिस आणखी काय माहिती देतात हे पाहावं लागेल.

पोलीस तपासादरम्यान अभिषेक घोसाळकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मॉरिस नोरोन्हा यांचा अंगरक्षक मिश्रा याला ताब्यात घेतले आहे. मॉरिसने ज्या बंदुकीने घोसाळकर यांना गोळ्या झाडल्या ती मिश्रा यांची होती. ही बंदूक परवानाधारक होती. पोलीस सध्या या सर्व प्रकाराची माहिती अंगरक्षक मिश्रा यांच्याकडून घेत आहेत.

दरम्यान, तर खासदार संजय राऊत यांनी या घटनेवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात माफिया राज पाहायला मिळत आहे. हे अपयश घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे, अशी टीका त्यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज