मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी दोघे ताब्यात; मुंबई पोलिसांची कारवाई

मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी दोघे ताब्यात; मुंबई पोलिसांची कारवाई

Abhishek Ghosalkar : शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. वैयक्तिक वादातून मॉरिस (Mumbai News) नारोन्हा उर्फ मॉरिस भाई या व्यक्तीने घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यानंतर मारेकऱ्यानेही आत्महत्या केली. यानंतर आता या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. मेहुल पारीख आणि रोहित साहू अशी या दोघांची नावं आहेत. गोळीबार झाला त्यावेळी यातील एकजण तिथे उपस्थित होता असे सांगण्यात येत असून तसा उल्लेख फेसबूक लाईव्हमध्ये घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिसने केला होता.

नेमकं काय घडलं?

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये एक वर्षांपूर्वी वादही झाला होता. दोघांमध्ये वैयक्तिक स्वरुपाचे वादही होते. दोघांमधील वाद मिटल्यानंतर आज दोघेही मॉरिसच्या ऑफिसमध्ये एकत्र आले होते. मॉरिसने स्वतःच्या कार्यालयात त्याने अभिषेक घोसाळकर यांना बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांबद्दल कौतुकाचं शब्द वापरल्याचं दिसून येतं आहे.

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण: मुंबई गुन्हे शाखा करणार खूनाचा उलगडा

दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतर अचानक मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. मॉरिसने एकूण 5 राऊंड फायर केले या 5 राऊंडपैकी तीन गोळ्या घोसाळकरांना लागल्या आहेत. एक गोळी अभिषेक घोसाळकरांच्या डोक्यात लागली तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तर इकडे मॉरिस यानेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात पैशांचा व्यवहार झाला होता, त्याच व्यवहारातून ही घटना घडल्याचे समोर येत आहे. याबाबत सविस्तर पोलिस तपास सुरू आहे. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube