मोठी बातमी! माढ्यात रणजितसिंह निंबाळकरांविरुद्ध धैर्यशील मोहितेंची लढत? पवारांकडून पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब

मोठी बातमी! माढ्यात रणजितसिंह निंबाळकरांविरुद्ध धैर्यशील मोहितेंची लढत? पवारांकडून पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब

Sharad Pawar : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha Election) नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश घेणार असल्याचे ठरले आहे. 14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्याचबरोबर 16 एप्रिलला त्यांचा माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे समोर आले आहे. पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे.

अक्षय आणि टायगरच्या ‘BMCM’वर पैशांचा पाऊस, वीकेंडला बॉक्स ऑफिसवर होणार धमाका

माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. तेव्हापासूनच मोहिते पाटील घराणे चांगलेच नाराज होते. त्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील वेगळा निर्णय घेणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. शरद पवार गटाकडून मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाणार अशी शक्यताही व्यक्त केली जात होती. तशी राजकीय समीकरणं जुळतानाही दिसत होतीच. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.

‘मोदींनी 10 वर्षांत चोऱ्या-माऱ्या शिवाय काहीच केलं नाही’; आंबेडकरांचा घणाघात

आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात आता महायुतीचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीकचे धैर्यशील मोहिते पाटील असाच सामना आपल्याला पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शरद पवार यांच्या भेटीला आल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी माध्यमांसमोर स्पष्टपणे आपली भूमिका स्पष्ट केली नाही. शरद पवार आणि मोहिते पाटील कुटुंबाचे जुने संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माढा लोकसभेबद्दल विचारणा केली असता त्यांनी सर्व गोष्टींसाठी वेट अॅण्ड वॉच असे सांगितले आहे.

शरद पवार यावेळी म्हणाले की, आमचे जुने सहकारी धैर्यशील मोहिते पाटील आमच्या पक्षामध्ये येत आहेत. ते आत्ताच आम्हाला भेटून गेले आहेत. त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश दोन दिवसानंतर होणार आहे. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube