बांग्लादेशच्या सीमेवर मोठा गोंधळ; भारतीय संतांची निदर्शने, चिन्मय प्रभूच्या सुटकेची मागणी

बांग्लादेशच्या सीमेवर मोठा गोंधळ; भारतीय संतांची निदर्शने, चिन्मय प्रभूच्या सुटकेची मागणी

Bangladesh Hindu Saint Ruckus On Border : बांग्लादेशात हिंदूंवर (Bangladesh News) हिंसाचार आणि संतांविरोधात दडपशाही सुरू आहे. त्यामुळे देशात संताप वाढू लागलाय. एका हिंदू नेत्याच्या अटकेच्या विरोधात पश्चिम बंगालमधील संतांच्या गटाने भारत-बांगलादेश सीमेवर मोठं आंदोलन (Hindu Saint) केलंय. 24 परगना पेट्रोपोल सीमा चौकीपासून सुमारे 800 मीटर अंतरावर पोहोचलेल्या साधू आणि संतांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी हिंदू आध्यात्मिक नेत्याच्या सुटकेची मागणी केली. यासोबतच त्यांनी बांग्लादेशच्या अंतरिम सरकारला त्यांच्या देशातील हिंदूंच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचं देखील आवाहन केलंय.

अखिल भारतीय संत समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या निदर्शनात सहभागी होण्यासाठी सकाळपासूनच साधू-संत आंदोलनस्थळी पोहोचत आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात संपूर्ण पश्चिम बंगालमधील संत आणि ऋषींनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आपलं मत व्यक्त केलं. पेट्रापोल सीमेवर पोहोचलेल्या एका साधूने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही सीमेवर जाऊन मानवी साखळी तयार करू. हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करून आम्ही भारत सरकार आणि बांग्लादेश सरकारला शांततेचा संदेश देऊ. ते म्हणाले की, बांग्लादेश सरकार हिंदूंवर होणारे हल्ले थांबवेल, अशी अपेक्षा आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा सुधारित हप्ता भाऊबीजेनंतर? भाजपच्या बड्या नेत्याचे संकेत

अखिल भारतीय संत समितीच्या बंगाल शाखेचे अध्यक्ष स्वामी परमात्मानंद यांनी रविवारी सांगितलं होतं की, जोपर्यंत बांग्लादेश सरकार हिंदू आणि मंदिरांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी कोणतीही कारवाई करत नाही, तोपर्यंत पेट्रापोल सीमेवर आंदोलन सुरूच राहील. दुसरीकडे, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) गेल्या काही दिवसांपासून कोलकाता येथील अल्बर्ट रोडवर असलेल्या केंद्रात प्रार्थना सभा आणि कीर्तन आयोजित करत आहे. हा गट दास यांच्या सुटकेची मागणी करतोय. शेजारील देशातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या दुर्दशेवर त्यांनी चिंता व्यक्त केलीय.

लक्झरी कार, चित्रपटांसाठी भरघोस फी, विक्रांत मॅसीची नेट वर्थ जाणून व्हाल थक्क

याशिवाय विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बुधवारी पेट्रापोल सीमेवर निषेध निदर्शने करण्याची घोषणा केलीय. भाजपसह हिंदू जागरण मंच आणि इतर धार्मिक संघटना देखील या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. बांग्लादेशातील हिंदू नेता इस्कॉनचे चिन्मय दास यांना अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली. हिंदूंच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी बोलणाऱ्या चिन्मय दास (Chinmoy Prabhu) यांना केवळ हिंदू असल्यामुळे अटक केल्याचा आरोप बांग्लादेशी हिंदूंनी सरकारवर केला होता. मात्र, बांग्लादेश सरकारकडून सांगण्यात आलंय की, चिन्मय दास यांना हिंदू असल्यामुळे अटक करण्यात आली नाही तर देशद्रोहाच्या खटल्यात अटक करण्यात आली आहे. यानंतर बांग्लादेशी हिंदू समुदायाने राजधानी ढाका आणि चट्टोग्रामसह अनेक ठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube