लक्झरी कार, चित्रपटांसाठी भरघोस फी, विक्रांत मॅसीची नेट वर्थ जाणून व्हाल थक्क
Vikrant Massey Net Worth : बॉलीवूडमध्ये (Bollywood) कमी वेळेत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता विक्रांत मॅसीने (Vikrant Massey) सर्वांना धक्का देत अभिनयातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रांत मॅसीच्या या घोषणेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. विक्रांत मॅसीने अचानक इतका मोठा निर्णय का घेतला ? याबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावण्या येत आहे.
तर दुसरीकडे सोशल मीडियावर (Social Media) सध्या विक्रांत मॅसीची लाईफस्टाईल आणि नेट वर्थ याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. 11 वर्ष बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर त्यांच्याकडे किती कोटी रुपयांची मालमत्ता आहे आणि त्यांच्याकडे कोणत्या कार आहेत याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
विक्रांत मॅसीची एकूण संपत्ती
अभिनय कारकिर्दीत, विक्रांत मॅसीने विविध टीव्ही शो, वेब सिरीज आणि चित्रपटांद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली छाप पाडली आहे. त्यामुळे त्याला एका दमदार अभिनेत्याचा टॅगही मिळाला आहे. नुकताच ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report) या चित्रपटात दिसलेल्या विक्रांत मॅसीची एकूण संपत्ती जाणून तुम्हाला धक्का बसेल. ई टाइम्सच्या अहवालानुसार, विक्रांतची एकूण संपत्ती सुमारे 20-26 कोटी रुपये आहे. तो चित्रपट आणि जाहिरातींसाठी सुमारे 1-2 कोटी रुपये घेतो. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
एकूण नेट वर्थ – 20-26 कोटी
चित्रपट फी- 1-2 कोटी
विक्रांत मॅसी कार कलेक्शन
विक्रांत मॅसीला लक्झरी लाईफस्टाईल जगण्याचीही आवड आहे. विक्रांत मॅसीकडे महागड्या कार आणि बाइक्स आहे. यामध्ये मर्सिडीज-बेंझ जीएलई रॅले कार आणि डुकाटी मॉन्स्टर बाईकचा समावेश आहे.
Mercedes-Benz GLE Raleigh Car : 97 लाख रुपये
Volvo S90 Car : किंमत 60.40 लाख
Maruki Suzuki Dezire – किंमत 8.4 लाख
Triumph Bonneville Bobber Bike – किंमत 12.35 लाख
Ducati Monster Bike – किंमत सुमारे 12 लाख
सेक्स वर्कर्सनाही मिळणार प्रसूती रजा, पेन्शन अन् आरोग्य विमा, जाणून घ्या नवीन कायदा
View this post on Instagram
अचानक इंडस्ट्री सोडली
विक्रांत मॅसीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून चित्रपटसृष्टी सोडण्याची घोषणा केली आहे. आता घरी परतण्याची वेळ आली आहे, असे अभिनेत्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. अनेक वर्षांपासून चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल त्याने आभार मानले आहेत आणि सांगितले आहे की त्याच्या कारकिर्दीतील शेवटचे दोन चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहेत.