IND vs SL : लंकेचा अँजेलो मॅथ्यूज ‘हिटमॅन’ साठी ठरणार डोकेदुखी; काय आहे पूर्व रेकॉर्ड

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 11 02T124322.697

IND vs SL :  विश्वचषकातील सर्वच्या सर्व सहा सामने जिंकत भारतीय संघाचा यंदाच्या स्पर्धेत वरचष्मा राहिला आहे. विजयाचा षटकार मारलेल्या भारतीय संघाचा आज (दि.2) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. यापूर्वीच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन म्हणून ओळख असणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) चांगली खेळी केली आहे. पण श्रीलंकेचा गोलंदाज अँजेलो मॅथ्यूजचे आव्हान रोहित समोर असणार आहे. कारण, यापूर्वीचा रेकॉर्ड बघता रोहितला अँजेलो मॅथ्यूच्या ( Angelo Mathews) गोलंदाजीवर हवी तशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. (Rohit Sharma Vs Angelo Mathews Head To Head Record)

World Cup 2023 : श्रीलंकेच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; आफ्रिकेचा संघ ठरला कारणीभूत

काय आहे रोहित आणि अँजेलो मॅथ्यूजची हेड टू हेड आकडेवारी

भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या विश्वचषकातील (World Cup 2023) जबरदस्त फॉर्मच्या आड श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज येऊ शकतो. या दोघांची मागील हेड टू हेड आकडेवारी पाहता रोहितला मॅथ्यूच्या गोलंदाजीवर चांगली फलंदाजी करता आलेली नाही. यापूर्वीच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये मॅथ्यूजने रोहितला सात ळा पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.

रोहित आणि मॅथ्यूज 31 एकदिवसीय सामन्यांमध्ये आमनेसामने आले असून, रोहितने मॅथ्यूजविरुद्ध 14.71 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. दोनदा मॅथ्यूजने रोहितला शून्यावरही पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. मॅथ्यूजसमोर रोहितचा स्ट्राईक रेट फक्त 58.85 इतका आहे.

सामाजिक अस्थिरतेचा नाट्य संमेलनाला फटका; मुहूर्तमेढीचा कार्यक्रम रद्द, स्वागताध्यक्षांचा राजीनामा

अँजेलो मॅथ्यूजचे दमदार पुनरागमन

एंजेलो मॅथ्यूजने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत. यापूर्वी श्रीलंकेच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला नव्हता, पण नंतर तीन खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे मॅथ्यूजचा मार्ग मोकळा झाला. सध्याच्या स्पर्धेत त्याने 8 षटकात 32 धावा देऊन 2 बळी घेतले आहेत. अशा स्थितीत हा अनुभवी खेळाडू यावेळीही रोहित शर्मासमोर चांगले आव्हान देऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे.

Tags

follow us