राज ठाकरेंचा तीन जागांवर दावा, ‘नाशिक’च्या मागणीने भाजप-शिंदे सेनेत अस्वस्थता

राज ठाकरेंचा तीन जागांवर दावा, ‘नाशिक’च्या मागणीने भाजप-शिंदे सेनेत अस्वस्थता

Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत अजून सहभागी नाही. परंतु, त्या दिशेने आता वेगाने पावले पडू लागली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर काल राज ठाकरे यांची (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी झालेल्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी महायुतीकडे दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी या तीन जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु, नाशिक किंवा शिर्डी या दोन्हींपैकी कोणताही मतदारसंघ मनसेकडे गेला तरी दणका भाजप-शिंदे सेनेलाच बसणार आहे.

राज ठाकरेंनी उघडपणे शाहांची भेट घेतली, काही जण गुपचूप…; नीलम गोऱ्हेंचा खोचक टोला

मागील आठवड्यात राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी दोन जागांची मागणी केल्याचे सांगितले गेले होते. त्यानंतर अमित शाह यांनी मात्र एक जागा देणे शक्य होईल असे स्पष्ट सांगितले. या घडामोडींनंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बैठक झाली.

या बैठकीत राज ठाकरे यांनी तीन जागांचा प्रस्ताव दिला. यामध्ये नाशिक, शिर्डी आणि दक्षिण मुंबई या तीन जागांचा समावेश आहे. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे मनसे या जागेची मागणी करणार हे सहाजिकच होते. तसचे मनसेने बाळा नांदगावकर यांच्यासाठी शिर्डीच्या जागेचीही मागणी केल्याचे सूत्रांकडून समजले. या दोन्ही जागांपैकी कोणतीही जागा मनसेला गेली तर शिंदे सेनेलाच फटका बसणार आहे.

Raj Thackeray : आरक्षण देण्याचा अधिकार मुळात राज्य सरकारला आहे का? राज ठाकरेंचा सवाल

नाशिक, शिर्डीची मागणी; शिंदे सेनेची धाकधूक वाढली 

दरम्यान, नाशिकच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात धुसफूस सुरू आहे. याठिकाणी शिंदे गटाचे हेमंत गोडसे खासदार आहे. काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांतील वाद वाढला आहे. तसेच शिर्डीमध्येही सध्या शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. याही मतदारसंघावर मनसेने दावा ठोकला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube