Raj Thackeray : आरक्षण देण्याचा अधिकार मुळात राज्य सरकारला आहे का? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray : आरक्षण देण्याचा अधिकार मुळात राज्य सरकारला आहे का? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray : मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी केली. मात्र यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आरक्षण देण्याचा अधिकार मुळात सरकारला आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. ते आरक्षणाच्या निर्णयावर माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

जरांगेंच्या तोंडाला पाने पुसले? सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा न करताच अधिवेशन गुंडाळले

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले. याचा आनंदच आहे.मात्र मला असं वाटतं. मराठा समाजाला जागृत राहावं. कारण सरकारकडून हे समाजाचे तोंडाला पाळण्यात पुसण्याचे काम सुरू आहे. असंच प्रकरण तामिळनाडूमध्ये देखील झालं होतं. राज्य सरकारने अशाच प्रकारचे आरक्षण त्या ठिकाणी दिलं होतं. मात्र त्या प्रकरणाची केस अद्यापही सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. त्याच्यापुढे काहीही झालेले नाही.

Maratha Reservation : शिंदे सरकारचं आरक्षण मंजूर नाही; जरांगेंनी इशारा देत पुन्हा उपसलं हत्यार

त्यामुळे आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला मुळात आहेत का? ही गोष्ट केंद्राच्या अधिकारात आहे. ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधील निर्णयाची आहे. सरकारने दहा टक्के आरक्षण दिले म्हणजे काय केलं? राज्य सरकारला हे अधिकारच नाहीत. आता पुन्हा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार. मग त्यावर राज्य सरकार सांगणार हे प्रकरणात सुप्रीम कोर्टात असल्याने आम्ही काहीही करू शकत नाही. म्हणजे हे आरक्षण केवळ निवडणुकांच्या तोंडावर देण्यात आला आहे. त्याला काहीही अर्थ नाही. अशी प्रतिक्रिया मलासे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

राज्य विधिमंडळाच्या विशेष (Maratha Reservation) अधिवेशनात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडले. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानंतर विधेयकावर मतदान होऊन विधेयक मंजूर झाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी केली. ओबीसी बांधव असो की अन्य कोणताही समाज असो आम्ही कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज