Maratha Reservation : शिंदे सरकारचं आरक्षण मंजूर नाही; जरांगेंनी इशारा देत पुन्हा उपसलं हत्यार
आंतरवली सराटी : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणाला आज एकमताने विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता मराठा समााजातील नारिकांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. आरक्षणाच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला सांगण्यात एक आले आणि प्रत्येक्षात अंमलबाजावाणी दुसऱ्याच गोष्टीची करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच देण्यात आलेले आरक्षण मान्य नाही. उद्या बैठकीनंतर आंदोलनाची घोषणा केली जाईल असेही जरांगेंनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील पुढची रणनीती काय आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (Manoj Jarange Patil First Reaction On Maratha Reservation)
जरांगेंच्या तोंडाला पाने पुसले? सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा न करताच अधिवेशन गुंडाळले
जरांगे म्हणाले की, सरकाराने दिलेल्या आरक्षणाचं स्वागत आहे. मात्र, आम्हाला सांगण्यात एक आले होते आणि देण्यात एक आहे. त्यामुळे शिंदे सरकारने दिलेले हे आरक्षण आम्हाला मान्य नाही. उद्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाबाबतची बैठक बोलावण्यात आली आहे. यात पढील दिशा ठरवली जाईल असेही जरांगेंनी स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणासाठी विशेष कायदा : भरती प्रक्रिया सुरु झालेल्या परिक्षांमध्ये लाभ मिळणार का?
सगेसोयरेवर ठाम
सरकारने मध्यंतरी काढलेली सगेसोयरेवरील अध्यादेशाची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. ती आम्ही मिळवणारच आहोत. सरकारने पहिल्यांदा त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन जरांगेंनी राज्य सरकारला केले आहे. शिंदेंवर विश्वास ठेवला नसता तर एवढ्या दिवस आंदोलन चाललंच नसतं. त्यांचा मान सन्मान केल्यानेच मराठा समाजाने सहा महिन्यांचा वेळ दिल्याचे जरांगे म्हणाले. मात्र, सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टात टिकेला का? याबाबत शंका असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आमच्या हक्काचे ओबीसी आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे.