राज ठाकरेंनी उघडपणे शाहांची भेट घेतली, काही जण गुपचूप…; नीलम गोऱ्हेंचा खोचक टोला
Neelam Gorhe : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मनसे एनडीत सहभागी होणार, त्यांना महायुतीच्या माध्यमातून दोन जागा सोडल्या जातील, अशी चर्चा आहे. याच भेटीवरून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. दरम्यान, आता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली.
‘ग्लोबल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर दोन प्रोजेक्ट्स मिळणं, अभिनेत्री श्रेया चौधरीनं थेटच सांगितलं
राज ठाकरे यांनी अमित शाह यांची उघडपणे भेट घेतली, काही जण गुपचूप भेटी घेतात, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
गोऱ्हे यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे बाळासाहेब ठाकरेंचे धोरण होतं. यातून अनेकदा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंच्या भेटी झाल्या आहेत. राज ठाकरे यांनी नेहमीच सरकारला सकारात्मक सल्ला देण्याचे काम केले आहे. काही सरकारने त्यांना सन्मान दिला. काहींनी त्यांचे ऐकले नाही. या पार्श्वभूमीवर ही एक भावनिक, सामाजिक आणि राजकीय भेट आहे. त्याच्यातून कुठलाच निष्कर्ष काढणं शक्य नाही. परंतु, बेरजेचे राजकारण जो शब्द यशवंतराव चव्हाणांनी तयार केला. काही लोकांचे राजकारण उण्याचे असते. कुणाला तरी उतरवून टाकू, काढून टाकू, असं असतं. त्यात महाराष्ट्राचे हित नाही, असं गोऱ्हे म्हणाल्या.
Loksabha Election : नो धंगेकर नो मोरे पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात वेगळचं नाव
पुढं बोलतांना त्या म्हणाल्या की राजकारणात संवाद, समन्वय, सहकार्य आणि मुद्द्यांवर एकजूट असणं आवश्यक असते. मराठी भाषेच्या प्रश्नासाठी राज ठाकरे यांनी नेहमीच आग्रहाची भूमिका घेतली. राज ठाकरे यांनी अमित शहा यांची उघडपणे भेट घेतली आहे. काही जण गुपचूप भेटी घेतात. राजकारणात कुणीही कुणालाही भेटू शकतो, असंही गोऱ्हे म्हणाल्या.
राजकारणाचा तो पाया आहे. राज ठाकरेंशी संवात आणि त्यातून महाराष्ट्रासाठी काही चांगले झाले तर त्यांचे मी स्वागत करते, असं म्हणत गोऱ्हे यांनी राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागावरही भाष्य केलं.