एकच प्रोडक्ट पुन्हा पुन्हा लाँच केल्याने काँग्रेसच्या दुकानाला टाळे ठोकण्याची वेळा, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

एकच प्रोडक्ट पुन्हा पुन्हा लाँच केल्याने काँग्रेसच्या दुकानाला टाळे ठोकण्याची वेळा, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्यांची अवस्था बघून खात्री पटली की त्यांनी बराच काळ तिथे (विरोधी पक्षात) बसण्याचा संकल्प केला आहे. तुमच्यापैकी अनेकांनी निवडणूक लढवण्याची हिंमत गमावली आहे, काहींनी गेल्या वेळी जागा बदलल्या होत्या आणि यावेळीही बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही राहुल गांधींना (Rahul Gandhi) लागवला.

पीएम मोदी पुढं म्हणाले, “प्रत्येक वेळेप्रमाणे तुम्ही (विरोधकांनी) लोकांची निराशा केली. नेते बदलले, पण ते त्याच जुन्या गोष्टी बोलत राहतात. निवडणुकीचे वर्ष आहे तर थोडी अधिक मेहनत घेतली असती नवीन काही शोधून आणले असते. पण विरोधकांच्या या अवस्थेला काँग्रेस पक्षच जबाबदार आहे. काँग्रेसने विरोधकांना पुढे जाऊ दिले नाही. विरोधकांनी संसदेचे कामकाज होऊ दिले नाही. असे करून विरोधकांनी संसदेचे आणि देशाचे नुकसान केले. यावेळी देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे.

राजनाथ सिंह अन् अमित शाहंसाठी मोदींची तुफान बॅटिंग; काँग्रेसला घेतलं फैलावर

अधीर बाबूंची अवस्था आपण पाहत आहोत, त्यांना एका कुटुंबाची सेवा करावी लागते. मल्लिकार्जुन खर्गे या सभागृहातून त्या सभागृहात शिफ्ट झाले. गुलाम नबी आझाद यांनी पक्षातूनच काढून टाकले, अशी टीका पीएम मोदींनी उपहासात्मकपणे केली. एकच प्रोडक्ट पुन्हा पुन्हा लाँच केल्याने काँग्रेसच्या दुकानाला टाळे ठोकण्याची वेळा आलीय. हे सर्व घराणेशाहीमुळे हे घडत आहे. काँग्रेस घराणेशाहीत अडकली आहे, असही मोदी म्हणाले.

PM Modi Speech : मोदींची गाडी पुन्हा विरोधकांवर घसरली; संसदेत रंगले ‘टोमणे’ नाट्य

पंतप्रधान मोदी म्हणाले की, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून म्हटले होते की भारताला सहसा कठोर मेहनत करण्याची सवय नाही. युरोप, जपान, चीन, रशिया आणि अमेरिका जेवढे काम करतात तेवढे आपण करत नाही. नेहरूंचा भारतीयांबद्दलचा दृष्टिकोन असा होता की भारतीय आळशी होते. परंतु खरंतर काँग्रेस आळशी आहे, असा हल्लाबोल केला.

Ram Mandir ची निर्मिती केवळ ईश्वराच्या इच्छेमुळेच शक्य झाली, मोहन भागवतांचं प्रतिप्रादन

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज