सुजय विखे-लंकेंचं पुन्हा सुरु! ‘शोले’चा किस्सा सांगत विखेंकडून खिल्ली…

सुजय विखे-लंकेंचं पुन्हा सुरु! ‘शोले’चा किस्सा सांगत विखेंकडून खिल्ली…

Sujay Vikhe On Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) पडघम वाजायला सुरुवात झाली असून येथे काही दिवसांमध्ये त्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया देखील पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आता उमेदवारांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. नगर दक्षिणेमधून महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikeh) यांनी निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या बालेकिल्ल्यात जात त्यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. यावेळी बोलताना सुजय विखेंनी शोले सिनेमातील किस्सा सांगत विखेंनी लंकेंवर निशाणा साधला आहे.

ठाकरेंसमोर काँग्रेस नतमस्तक, घरचा आहेर देत निरूपम यांनी दिले ‘जय महाराष्ट्र’ करण्याचे संकेत

लोकसभेचे बिगुल वाजले असून नगर दक्षिणेमधून महायुतीकडून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. असे असले तरी निलेश लंके यांची उमेदवारी ही महाविकास आघाडीकडून निश्चित मानले जात आहे. त्यापूर्वीच विखे यांनी आता बालेकिल्ल्यात जात त्यांच्यावरती निशाणा साधला आहे. पारनेरमध्ये एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी लंकेंवरती टीका करत सभेसाठी योग्य उमेदवारच निवडून द्यावा असे आवाहन देखील त्यांनी जनतेला केले.

‘डायलॉगबाजी मालिकेत ठिक, जनतेसमोर घाम गाळावा लागतो’; दादांचा कोल्हेंना खोचक टोला

यावेळी बोलताना विखे म्हणाले की, पारनेर तालुका हा सर्वात बुद्धिवंत तालुका आहे. इथली जनता योग्य तो निर्णय घेत योग्य तो निर्णय देईल असा विश्वास यावेळी विखे यांनी व्यक्त केला. ही निवडणूक कोण आहे कोण नाही याबाबत नाही. कोणाच्या हाती सत्ता द्यायची कोणाच्या नाही हे देखील नाही. देश कोणाच्या हातात द्यायचा आहे त्यासाठी ही निवडणूक आहे. मोदी नाही तर दुसरा कोण असा सवाल देखील यावेळी विखे यांनी उपस्थित त्यांना केला.

शोलेचा किस्सा
मंचावरूनच भाषण करताना विखे यांनी शोले सिनेमावरून पारनेरचे वास्तविक समोर आणले. प्रत्येक व्यक्ती हा आपण कसे चांगले आहोत असे आपल्या पक्षातील नेतृत्वाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र हे सांगत असतानाच त्यांनी पुढे शोले सिनेमातील एक किस्सा सांगत नामोल्लेख टाळत आमदार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला आहे.

नगरदक्षिणेत विखे विरुद्ध लंके
लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्राची दुसरी यादी जाहीर झाली नगर दक्षिणेमधून महायुतीकडून सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली. तर लोकसभेसाठी इच्छुक असलेले निलेश लंके यांनी देखील निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली. पवार गटात असलेली लंके ही लोकसभे निवडणुकीपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश करत निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. यामुळे येत्या काळात नगर दक्षिणेमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार हे मात्र नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube