राम शिंदेंकडून सुजय विखेंना शुभेच्छा, पण चेहऱ्यावर नाराजीच…

राम शिंदेंकडून सुजय विखेंना शुभेच्छा, पण चेहऱ्यावर नाराजीच…

Ram Shinde & Sujay Vikhe : भाजपकडून लोकसभेचे उमेदवारांची (Loksabha Electioin) यादी जाहीर झाली. यामध्ये नगर दक्षिणमधून सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उमेदवारी जाहीर झाली. लोकसभेच्या अनुषंगाने आज नगर शहरांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी भाजप आमदार राम शिंदे यांनी मंचावरच सुजय विखे यांना शुभेच्छा देत त्यांचा सत्कार देखील केला. मात्र, असे असले तरी राम शिंदे हे नाराज असल्याचे दिसून आले आहेत. शिंदे आणि विखे मंचावर एकत्र बसले होते, मात्र त्यांच्यामध्ये कोणताही संवाद न झाल्याने शिंदे हे नाराज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

‘मिसेज चॅटर्जी वर्सेज नॉर्वे’चे एक वर्ष पूर्ण होताच अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, “मी कृतज्ञतेने…”

लोकसभेची यादी जाहीर होतात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची नगर शहरात आढावा बैठक पार पडली आहे. लोकसभेची रणनीती काय असणार यावर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपाचे उमेदवार सुजय विखे तसेच आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार राम शिंदे तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार गटात धुसफूस? आमदार रोहित पवारांचं ट्विट तर तसेच संकेत देतंय..

याप्रसंगी आमदार राम शिंदे बोलताना म्हणाले की, भाजपकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मी देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होतो. मात्र, पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत केलं तसेच मी सुजय विखे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. शिंदे यांनी मंचावरच विखे यांना शुभेच्छा दिल्या खऱ्या मात्र, आपल्याला लोकसभा उमेदवारीला डावलण्यात आल्याने यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट झळकत होती.

सारा सोबतच्या इंटीमेट सीनबद्दल अभिनेत्याने थेटच सांगितलं; म्हणाला, ‘मला ओढले आणि…’

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात अंतर्गत वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत होतं. एवढचं नाहीतर दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टीप्पण्याही सुरु असल्याचं दिसून येत होतं. विखे आणि शिंदे दोघेही एकमेकांच्या टीकांना प्रत्युत्तर देत असल्याचं दिसून येत होतं. त्यानंतर राम शिंदे यांनी आपणही अहमदनगर लोकसभेसाठी इच्छूक असल्याचं स्पष्ट केलं होतं.

भाजपकडून नक्की कोणाला उमेदवारी जाहीर होणार याबाबत शंकाकुशंका होत्या, अखेर भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत अहमदनगर लोकसभेसाठी सुजय विखेंच नाव समोर आलं. आता पुढील काळात राम शिंदे सुजय विखेंचा प्रचार करणार का? सुजय विखेंसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघात ताकद लावणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube