Akshay Kumar भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार? सर्वत्र चर्चांना उधाण

Akshay Kumar भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार? सर्वत्र चर्चांना उधाण

Akshay Kumar Lok Sabha Election 2024: बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) राजकारणात एंट्री करण्याची जोरदार चर्चा रंगत आहे. अक्षय कुमार भाजपच्या ( BJP) तिकीटावर आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवणार असल्याची जोरदार सध्या जोर धरत आहे. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने रणनीती बनवायला सुरुवात केली आहे. देशाची राजधानी दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने युती करून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत आप पक्ष 4 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर काँग्रेस 3 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आता भाजपही दिल्लीत नव्या चेहऱ्यांच्या जोरावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊ शकतात. अशा परिस्थितीत भाजप बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमारला उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

अक्षय कुमार राजकारणात येणायची शक्यता: मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता अक्षय कुमारला भाजप दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाचे काही नेते अभिनेत्याच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Sonu Sood चा अभिनव उपक्रम, एंडोर्समेंट फी ऐवजी करणार गरजूंना मदत

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी 2014 आणि 2019 मध्ये दोनदा या जागेवर विजय मिळवला होता. ही जागा काँग्रेसचे माजी नेते आणि केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी 2004 आणि 2009 मध्ये जिंकली होती.

अक्षय कुमारचा कल भाजपकडे: अक्षय कुमारचे भाजपसोबत चांगले संबंध आहेत. सध्या या अभिनेत्याच्या करिअरचा आलेखही घसरत चालला आहे, त्याचे यापूर्वीचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत. सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट “बडे मियाँ छोटे मियाँ”मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अक्षयला या ॲक्शनपॅक्ड चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार असल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे. हा चित्रपट 9 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज