मराठवाड्यातील हुकूमी एक्का, मोदी लाटेतही ‘विजयी’; चव्हाणांच्या ‘पॉलिटिक्स’ची BJP लाही गरज

मराठवाड्यातील हुकूमी एक्का, मोदी लाटेतही ‘विजयी’; चव्हाणांच्या ‘पॉलिटिक्स’ची BJP लाही गरज

Maharashtra Politics : राज्यात महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी (Lok Sabha Election 2024) केली जात असतानाच आघाडीला जोरदार दणका बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना हा राजकीय भूकंप झाल्याने आघाडी बॅकफूटवर ढकलली गेली आहे. काँग्रेस सोडल्यानंतर (Congress) पुढे काय करणार याचे उत्तर अशोक चव्हाण यांनी अजून दिलेले नाही. मात्र आजच त्यांचा भाजपात प्रवेश होईल अशी बातमी आली आहे.

तसे पाहिले तर सध्याच्या परिस्थितीत भाजपबरोबर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे गट आहेत आणि भाजपचे स्वतःचे 104 आमदार आहेत. राज्यात सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे. निवडणुकीतही शिंदे आणि अजितदादा भाजपसोबत असल्याने भाजपला निवडणूक काहीशी सोपी ठरणार आहे. मग असे असतानाही भाजपकडून नव्या मित्रांची शोधमोहीम का सुरू ठेवली जात आहे? दुसऱ्या पक्षातील मोठे नेते गळाला लावण्याचे कारण काय? आणि काही दिवसात अशोक चव्हाण भाजपसोबत जाणार का? भाजपला त्यांची अचानक गरज का वाटू लागली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

Eknath Khadse : एकनाथ खडसेंची भाजपात येण्याची तयारी? महाजनांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्रात काँग्रेसला एका पाठोपाठ तीन झटके बसले आहेत. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण. या तीन दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला आहे. या तीन नेत्यांच्या जाण्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. राज्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचा आश्वासक चेहरा म्हणून अशोक चव्हाण यांची ओळख आहे. मोदी लाटेतही निवडून येण्याची किमया त्यांनी करून दाखवली आहे. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांची पुढील राजकीय कशी राहिलं याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही.

परंतु भाजपला त्यांच्यात इतका का इंटरेस्ट आहे? याचं उत्तर जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अशोक चव्हाण यांना काँग्रेसने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी संधी दिली. हा निर्णय सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा होता. परंतु पुढे त्यांच्या कार्यकाळात आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळा समोर आला जो काँग्रेससाठी चांगलाच डोकेदुखीचा ठरला.

मोदी लाटेतही विजय खेचून आणला 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्याप्रमाणेच अशोक चव्हाण सुद्धा मराठवाड्यातील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. 2014 मध्ये मोदी लाटेत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा झटका बसला पण अशोक चव्हाण मात्र या लाटेत सुद्धा नांदेड लोकसभा मतदरसंघांतून निवडून आले. त्यांच्या या विजयाची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. विशेष म्हणजे या मतदारसंघात पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र तरीही मतदारांनी अशोक चव्हाण यांची साथ सोडली नाही.

Ashok Chavan : ठरलं तर! अशोक चव्हाणांसह आणखी एका आमदाराचा भाजपप्रवेश; आजचाच मुहूर्त

यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातून विजय मिळवला.

भाजपच्या मनात नेमकं काय?

सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार आहे. तरीदेखील आगामी निवडणुकांचा विचार केला तर येथील निवडणूक सोपी नाही याचा अंदाज भाजपला आहे. त्यामुळेच भाजपने २०१९ पासूनच त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. मागील वर्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अशोक चव्हाण यांची भेटही खूप चर्चेत राहिली होती. दोघांतील तणाव कमी करण्याची सुरुवात या बैठकीपासूनच झाली होती असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील सरकारला जेव्हा विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती तेव्हा अशोक चव्हाण त्यांच्या काही समर्थक आमदारांसह हजर नव्हते. यानंतर वाहतूक कोंडीचे कारण देत त्यांनी वेळ मारून नेली होती. भाजपाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय म्हणून याकडे पाहिले गेले होते. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांची पुढील राजकीय वाटचाल काय असेल याचे उत्तर अजून स्पष्ट नाही. मात्र त्यांचे राजकारणातील वजन पाहता भाजप त्यांना आपल्या गटात सामील करून घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार यात काही शंका नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज