Ashok Chavhan यांच्या प्रवेशाबाबत फडणवीसांचे संकेत पण बावनकुळेंकडे प्रस्ताव नाही; गौडबंगाल काय?
Ashok Chavhan : एकीकडे कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या जोरदार चर्चां सुरू आहेत. त्यात आता चव्हाणांनी कॉंग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने जवळपास त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज मी एवढेच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या. म्हणत सूचक वक्तव्य केलं असताना. आता मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजून चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचा प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही. असं म्हटलं आहे. त्यामुळे हे गौडबंगाल नेमकं काय? अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.
Ashok Chavan: अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम! पटोलेंना लिहिलेलं पत्र Letsupp च्या हाती!
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे की, काँग्रेस पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्याची क्षमता नसल्याने त्यांच्यात अंतर्गत वाद आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी राजीनामा नेमका कोणत्या कारणामुळे दिला आहे? हे बघावं लागेल. मात्र काँग्रेस पक्षामधील मोठे मोठे नेते भारतीय जनता पक्षाचे संपर्कात आहेत.
यामध्ये आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये नाराज असलेले मिलिंद देवरा बाबा सिद्दिकी त्यांची नाराजी समोर आली आहे. त्यात आता अशोक चव्हाण यांनी देखील राजीनामा दिला. असेच प्रकरण पुढच्या काळात खूप दिसतील. मात्र आताच्या घडीपर्यंत अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येणार असल्याचं कोणताही प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही. मात्र पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प केला असल्याने या संकल्पना साथ देण्यासाठी आमची विचारधारा कुणी स्वीकारत असेल तर त्यांचे स्वागत आहे. असंही बावनकुळे म्हणाले आहेत. त्यामुळे एकीकडे फडणवीस चव्हाणांच्या प्रवेशाबद्दल संकेत देत आहेत. बावनकुळे मात्र प्रस्ताव नाही म्हणत असल्याने नेमकं कारण काय हे समोर येत नाही.
अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम!
राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. (Maharashtra Politics) तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघात झालेल्या चर्चेची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. मात्र, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
फडणवीसांचं सूचक वक्तव्य…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांदरम्यान एक सूचक वक्तव्य केलं आहे. फडणवीस म्हणाले की,आज मी एवढेच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या. भारतीय जनता पक्ष सोबत वेगवेगळ्या पक्षांचे अनेक मोठे नेते येऊ इच्छित आहेत विशेषतः काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते.