Devendra Fadanvis : आगे आगे देखो होता है क्या, चव्हाणांच्या भाजप प्रवेशादरम्यान फडणवीसांचं सूचक वक्तव्य

Devendra Fadanvis : आगे आगे देखो होता है क्या, चव्हाणांच्या भाजप प्रवेशादरम्यान फडणवीसांचं सूचक वक्तव्य

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांदरम्यान एक सूचक वक्तव्य केलं आहे. फडणवीस म्हणाले की,आज मी एवढेच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या. भारतीय जनता पक्ष सोबत वेगवेगळ्या पक्षांचे अनेक मोठे नेते येऊ इच्छित आहेत विशेषतः काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते.

Video: चाहत्याला मारलं, मग फोनच फेकून दिला; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्यचं गैरवर्तन

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, आज मी एवढेच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या. भारतीय जनता पक्ष सोबत वेगवेगळ्या पक्षांचे अनेक मोठे नेते येऊ इच्छित आहेत. विशेषतः काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. कारण ज्या प्रकारची वागणूक काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आहे. त्यामुळे या सर्व नेत्यांची तिथे घुसमट होत आहे.

Ashok Chavhan : अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाण्याची सतत चर्चा का होते?

विशेषता जे लोकांमधील नेते आहेत. त्यांना वाटत आहे की, देशीतील मुख्य प्रवाहासोबत काम करायला हवं. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून देश हिताला डावललं जात आहे. तसेच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रगती करत आहे ते पाहून अनेक नेत्यांना वाटत आहे की आपण देखील देशातील मुख्य प्रवाह सोबत काम करायला पाहिजे जनतेसाठी काम केले पाहिजे त्यामुळे अनेक पक्षातील लोक आमच्या संपर्कात आहेत त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे हे आम्ही हळूहळू सांगू.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये महाभूकंप; अशोक चव्हाणांकडून आमदारकीचा राजीनामा?

तसेच पुढे फडणवीस म्हणाले की, यावेळी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, भाजपकडून कोणत्याही नेत्यांना पक्षात घेण्यासाठी लक्ष केले जात नाही. मात्र महाविकास आघाडीतील अनेक लोक आमच्या संपर्कात असतात. असं म्हणत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांदरम्यान एक सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे लवकरच चव्हाणांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे संकेत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube