महाराष्ट्र काँग्रेसमध्ये महाभूकंप; अशोक चव्हाणांकडून आमदारकीचा राजीनामा?

  • Written By: Published:
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये महाभूकंप; अशोक चव्हाणांकडून आमदारकीचा राजीनामा?

मुंबई : अजितदादांच्या बंडानंतर आता पुन्हा राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना चव्हाण यांचा राजीनामा मोठी उलथापालत घडवून आणणारा दिसून येत आहे. यामुळे चव्हाण यांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली जाणार की काय? अशीही शक्यता व्यक्त होत आहे. चव्हाण यांच्यासोबत काँँग्रेसमधील आणखी कुणी नेते बाहेर पडणार का? याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी चव्हाण भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. त्यानंतर आता चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र, ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही. चव्हाणांसोबत चंद्रकांत हांडोरे, नसीम खान हेदेखील भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. (Congress Leader Ashok Chavan May Be Inter In BJP )

Ashok Chavhan : अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाण्याची सतत चर्चा का होते?

अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्य झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

शिंदे, अजितदादांमुळे मला मतदार संघचं उरला नाही; पंकजा मुंडेंनी आळवला नाराजीचा सूर

काँग्रेसचे काही नेते आमच्या संपर्कात असून ते आमच्याबरोबर येण्यास तयार असल्याचे भाजपचे नेते सांगतात. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हेही संपर्कात असल्याचे अनेकदा भाजप नेत्यांकडून सांगितले. अशोक चव्हाण हे भाजपमधील येतील, असा दावा नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांचा दावा खोडून काढला होता. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सोलापूर दौऱ्यावर अशोक चव्हाण यांच्याबाबत थेट भूमिकाच जाहीर करून टाकली आहे.

अमित शाह संभाजीनगरात फोडणार लोकसभेच्या प्रचाराचा नारळ, कुणाला मिळणार उमेदवारी?

अशोक चव्हाण नॉटरिचेबल

दुसरीकडे अशोक चव्हाण यांचा फोन नॉटरिचेबल असल्याचेदेखील सांगितले जात आहे. तर, दुसरीकडे भाजपकडून आज काही पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अतिशय गुप्त ठेवण्यात आला होता. त्याशिवाय आज एकम महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, आशिष शेलार या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचा मेसेज भाजपकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर काही माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असे सांगितले जात होते. मात्र, आता काँग्रेसचा बडानेता भाजपमध्ये प्रवेश करू शकतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यात चव्हाणांनी नार्वेकरांची भेट घेऊन आमदाराकीचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. आता चव्हाणांसोबत कोण कोण नेते भाजपात प्रवेश करणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अशोक चव्हाणांसोबत कोण कोण जाणार? 

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर चव्हाणांसोबत काँग्रेसचे कोण कोणते आमदार भाजपात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यानंतर आता चव्हाणांसोबत मोहनराव हांबर्डे, जितेश आंतापूरकर, अशोक धोटे, गवळणकर हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube