Video: चाहत्याला मारलं, मग फोनच फेकून दिला; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्यचं गैरवर्तन

Video: चाहत्याला मारलं, मग फोनच फेकून दिला; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्यचं गैरवर्तन

Aditya Narayan’s Concert: गायक आदित्य नारायणचा (Aditya Narayan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आदित्य (Viral Video) भिलाईमध्ये एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे. कॉन्सर्ट सुरू असताना आदित्यने एका चाहत्याचा फोन हिसकावून फेकून दिला. त्याचे हे वागणे चाहत्यांना आजिबात आवडले नाही आणि यूजर्स त्याला या कारणावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Luzina Khan /Travel & Food Blogger & Photographer (@luzinakhan)


आदित्यने चाहत्याला माइक मारला: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, आदित्य गाणे म्हणत असताना अचानक एका चाहत्याजवळ येतो. आधी तो माईकने चाहत्यांच्या हातावर मारतो. त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने त्याचा माईकने चाहत्याला मारलं आहे आणि त्याचा मोबाइल हिसकावून तो जमावाच्या दिशेने फेकला आहे. यानंतर आदित्य तिथून निघून जातो आणि पुन्हा गायला लागतो. आदित्यने असे का केले याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र, चाहते त्यांच्या या वागण्यावर अजिबात खूश नाहीत. त्याच्यावर चाहते प्रचंड नाराज आहेत.

आदित्यवर यूजर्स संतापले: एका यूजरने लिहिले – याआधी आदित्यने रायपूर एअरपोर्टवर ग्राउंड स्टाफसोबत गैरवर्तन केले होते. त्याचवेळी काही लोक त्याच्या वागण्याला चुकीचे म्हणत आहेत. एका युजरने लिहिले – त्याला कशाचा अभिमान आहे हेच कळत नाही. बिचाऱ्याचा फोन फेकून दिला. त्याच्या या वागण्यावर सध्या त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

12th Fail सिनेमाबद्दल इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने थेटच सांगितलं; म्हणाला, “जिद्द आणि संघर्षाची… “

याआधीही आदित्य जेव्हा छत्तीसगडला गेला होता, त्यावेळेस देखील तो मोठ्या वादात सापडला होता. रायपूरमध्ये विमानतळावरील कर्मचाऱ्यांशी त्यांचे भांडण झाले. 2017 मध्ये त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसत होता.

आदित्यही अभिनय करताना दिसला: आदित्य नारायण इंडियन आयडॉल, सा रे ग म प 2023, सा रे ग म प लिल चॅम्प्स सारखे रिॲलिटी शो होस्ट करताना दिसले आहेत. मागच्या वेळी तो पंड्या स्टोर शोमध्ये स्पेशल अपिअरन्स देताना दिसला होता. आदित्यने अभिनयातही हात आजमावला आहे, पण त्याला यश मिळाले नाही. परदेस या चित्रपटात तो बालकलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. 2010 मध्ये तो शापित चित्रपटातही दिसला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज