Video : महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होणार; पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
या महिन्यात एक मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खळबळजनक विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
A Marathi man will become the Prime Minister : देशाच्या राजकारणाला धक्का देणारी मोठी बातमी सध्या समोर येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. या महिन्यात एक मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो. असा खळबळजनक दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या खळबळजनक विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commision) कारभारावर देखील ताशेरे ओढले आहेत. निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळाचा त्यांनी निषेध नोंदवला. निवडणूक आयोगानं हा जो सगळा सावळा गोंधळ घातलाय त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले की, हा आंतरराष्ट्रीय विषय आहे, अमेरिकेत (America) जेफ्री अॅमस्टिन नावाचा एक मोठा उद्योगपती आहे. त्या माणसाबद्दलचा हा विषय आहे. त्याने कायदा मोडला. त्याने भरपूर बेकायदेशीर कारवाया केल्या. कायदा मोडला. त्याने खूप बेकायदेशीर कारवाया केल्या. त्यात राजकीय पक्षांतील नेत्यांना गुंतवायचं आणि भानगडी करायला लावायच्या असा तो विषय आहे. अमेरिकेतील सगळ्या मोठ्या नेत्यांची नावं यात आली आहेत. त्यात राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांचं देखील नाव आहे. त्यामुळे कदाचित ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागेल. अमेरिकेत निवडणूक आयोगाचे निकष खूप कडक आहेत. ट्रम्प यांनी राजीनामा देणं हा त्यांचा विषय आहे.
अमेरिकेची संसद त्यांच्या मागं लागली असून नावं खुली करण्यास त्यांना सांगत आहे. मात्र ट्रम्प ते करत नाहीत. कारण नावं खुली केली तर अनेक लोकं अडचणीत येणार आहेत. मागच्या 6 महिन्यांपासून संसद ट्रम्प यांच्या मागे लागली आहे. यासंदर्भातली 10 हजार कागदपत्रं संसदेने ताब्यात घेतली असून ही कागदपत्रं ते उघड करू शकतात. सुब्रमण्यम स्वामी यांनी हा व्हिडिओ केला असून, ते म्हणतात की, मला ती कागदं मिळतील. कागदं मिळाल्यावर या विषयावर सुब्रमण्यम स्वामी बोलतील. त्यावर आज संसदेत गदारोळ देखील होऊ शकतो. मी फक्त म्हटलं मराठी माणूस पंतप्रधान होणार आहे. त्यातून तुम्हाला काय अर्थ काढायचाय तो काढा.
