सारा सोबतच्या इंटीमेट सीनबद्दल अभिनेत्याने थेटच सांगितलं; म्हणाला, ‘मला ओढले आणि…’

सारा सोबतच्या इंटीमेट सीनबद्दल अभिनेत्याने थेटच सांगितलं; म्हणाला, ‘मला ओढले आणि…’

Vijay Verma Intimate Scene: सारा अली खान (Sara Ali Khan), करिश्मा कपूर, पंकज त्रिपाठी आणि विजय वर्मा (Vijay Verma) स्टारर चित्रपट ‘मर्डर मुबारक’ (Murder Mubarak) ओटीटी OTT प्लॅटफॉर्म Netflix वरून आज रिलीज करण्यात आला आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत या मर्डर मिस्ट्री स्टोरीला मोठी पसंती मिळत आहे.

सारा आणि विजय वर्मा पहिल्यांदाच पडद्यावर काम करताना दिसत आहेत. त्या दोघांची केमिस्ट्री देखील सर्वांनाच आवडली आहे. या चित्रपटात दोन्ही स्टार्सवर एक इंटिमेट किसिंग सीनही शूट करण्यात आला आहे, ज्याची खूप जोरदार चर्चा सुरु आहे. विजय वर्माने अभिनेत्रीसोबतच्या शूटिंग करतानाचा अनुभव सांगितला आहे.

विजय वर्मा आणि सारा अली खान यांनी ‘मर्डर मुबारक’ चित्रपटात बालपणीच्या प्रेमिकांची भूमिका साकारली आहे. त्यात एकतर्फी प्रेमाची कथाही दाखवण्यात आली आहे. ही कथा इतर कोणाची नसून विजय आणि साराची आहे. या चित्रपटात त्यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते. या दोघांनी एकत्र एक इंटिमेट सीनही दिला आहे, जो चित्रपट रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. तर विजयने सारासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला की या दोघांची केमिस्ट्री या चित्रपटाच्या सेटवर दिसली होती. ते एकत्र खूप हसायचे आणि विनोद करायचे. यामुळे, तो सारासोबत इंटिमेट सीन करेल आणि तेही एवढ्या जबरदस्त केमिस्ट्रीसह करेल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

इंटिमेट सीनबद्दल विजय वर्माने सांगितले की, सारा तिच्या कॅरेक्टरमध्ये इतकी मग्न होती की तिने अभिनेत्याला खेचले आणि सिझलिंग सीन दिला. त्यावेळी विजयला जाणवले की जेव्हा दोन कलाकार एका आरामदायक नातेसंबंध सामायिक करतात आणि त्यांच्यातील संकोच दूर करतात तेव्हा ते त्यांची पात्रे उत्तम साकारू शकतात आणि केमिस्ट्री देखील तयार करू शकतात.

बिग बी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी फेक, अभिनेत्याचं मॅच पाहताना व्हिडिओ व्हायरल

करिनासोबतच्या रोमँटिक सीनमध्ये अभिनेत्याचे स्पष्टीकरण

सारा याआधी विजयने करीना कपूरसोबत ‘जाने जान’ या चित्रपटात काम केले होते. करीनासोबत अभिनेत्याचे काही रोमँटिक सीन्स होते, ज्याबद्दल त्याने सांगितले होते की, ते शूट करताना खूप नर्व्हस झाले होते. पण, साराच्या बाबतीत असे काही घडले नाही. त्यापेक्षा सारासोबतचा अभिनेत्याचा अनुभव चांगला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज