‘डायलॉगबाजी मालिकेत ठिक, जनतेसमोर घाम गाळावा लागतो’; दादांचा कोल्हेंना खोचक टोला

‘डायलॉगबाजी मालिकेत ठिक, जनतेसमोर घाम गाळावा लागतो’; दादांचा कोल्हेंना खोचक टोला

Ajit Pawar On Amol Kolhe : डायलॉगबाजी चित्रपट अन् मालिकेत ठिक, जनतेसमोर घाम गाळावा लागतो, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना लगावला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील हेच महायुतीचे उमेदवार राहणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर खोचक टोलेबाजी केली आहे.

आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून शरद पवार गट आक्रमक; गद्दारीचा महामेरू म्हणत व्हिडीओ शेअर…

अजित पवार म्हणाले, आम्ही दुपारीच राष्ट्रवादीचा पहिला उमदेवार घोषित केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार असल्याचं अजितदादांनी जाहीरपणे सांगितलं आहे. तसेच तुम्ही गहाळ बसू नका, कामाला लागा, समोरचा उमेदवार कामाला लागलायं
तो डॉयलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. डायलॉबाजी करणं चित्रपट, मालिकेत ठिक आहे. जनतेसमोर घाम गाळावा लागतो, काम करावं लागतं, घाम गाळण्याची ताकद शिवाजीरावांमध्ये असल्याचं अजित पवार यांनी कोल्हेंवर रोख धरुन म्हटलं आहे.

तसेच निवडून आल्यावर हा बाबा (अमोल कोल्हे) राजीनामा द्यायला निघेल असं वाटलं नव्हतं आम्ही काय तेव्हा मनकवडे होतो का? राजीनामाच द्यायचा होता तर मग उभं का राहिला बाबा… चित्रपटाचंच काम करत बसायचं ना.. एकीकडे म्हणायचे मी छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो तर मग 2022 व्हाय किलं महात्मा गांधीमध्ये तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली हे पटलं का? हे कसं केलं? आता पाहु काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतात का? असा सवाल अजितदादांनी यावेळी उपस्थित केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube