‘इतकी वर्ष संधी अन् उपमुख्यमंत्री कोणी केलं’; शरद पवारांसाठी अमोल कोल्हे मैदानात
Amol Kolhe On Ajit Pawar : इतकी वर्षी संधी अन् उपमुख्यमंत्री कोणी केलं, असा खडा सवाल उपस्थित करीत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पलटवार केला आहे. दरम्यान, आम्हाला सत्तरीच्या पुढे गेल्यावर संधी मिळणार का? अशी सडकून टीका अजित पवार यांनी काल मंचरच्या सभेत शरद पवारांवर केली होती. या टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
वीर सावरकरांचे नाव न घेतल्याने देवधर भडकले; पोर्ट ब्लेअरमध्ये क्रू मेंबरला घेतले फैलावर
अमोल कोल्हे म्हणाले, 2014 पासून शरद पवार कोणत्याही सत्तेच्या पदावर नाही. आम्ही साठ वर्षाचे झालो तरी आम्हाला संधी मिळाली पाहिजे असं अजित पवार म्हणत असतील तर मग इतकी वर्ष संधी कोणी दिली अन् उपमुख्यमंत्री कोणी केलं? असा पलटवार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
तसेच 2019 च्या सकाळच्या शपथविधी नंतर जो काही प्रकार झाला होता. त्यांनतर देखील मन मोठं करून ही संधी कोणी दिली होती. 2019 ला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांच्या सभागृहात पहाटेच्या दरम्यान उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावरुनही अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर टोलेबाजी केली आहे.
‘मविआ’च्या बैठकीआधीच प्रकाश आंबेडकरांचा ‘खो’; 15 जागांचा उल्लेख करत सांगितला ‘तिढा’
काय म्हणाले होते अजित पवार?
पुण्यातील मंचरमध्ये काल अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, आम्हीही साठीच्या पुढे गेलोयं आम्हाला कधी संधी मिळणार? सत्तरी झाल्यावर संधी मिळणार का? घरातला तरुण 25-30 वर्षांचा झाला की त्याच्याकडे शेती दिली जाते मग आम्ही काय पाप केलं होतं? आम्हाला कोणाला त्रास द्यायचा अन् कमी लेखायचं नाही. आम्ही वडिलधाऱ्यांचा आदर करणारेच आहोत पण वडिलधाऱ्यांनीही आम्हाला मुबा दिली पाहिजे, अशी गंभीर टीका अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केली होती.
दरम्यान, पुण्यातील आयोजित कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी सर्वच समाजबांधवांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. यामध्ये मूलनिवासी मुस्लिम मंच, भीमआर्मी बहुजन एकता मिशन, संभाजी ब्रिगेड, रिजनल ख्रिश्चन सोसायटी व इतर फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर काम करणाऱ्या संघटनांना कोल्हेंनी आवाहन केलं आहे. समता, स्वतंत्र, बंधुत्व आणि न्यायावर आधारित राष्ट्र निर्माण करण्यासाठी “अमन का करवा” ची सुरुवात अमोल कोल्हेंच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.