तीन पक्ष फिरुन येणारांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत; अजित पवारांचा रडारवर पुन्हा अमोल कोल्हे

  • Written By: Published:
Ajit Pawar

Ajit Pawar on Amol Kolhe : शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली आहे. सेलिब्रिटी उमेदवारांवर तिकीट देऊन चूक झाली, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. मी पक्षात यावं म्हणून मला गुपचूप भेटून दहा दहा वेळा निरोप का पाठवले? असं खोचक प्रत्युत्तर अमोल कोल्हे यांनी दिलं होतं. यानंतर अजित पवार यांनी पुन्हा मंचरच्या सभेतून अमोल कोल्हेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अजित पवार म्हणाले की, काही लोक बोलघेवडे असतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. विकासाची वज्रमूठ पाहा आणि त्यावर लक्ष द्या. काहींनी मंचरमध्ये स्वाभिमानाच्या बढाया मारल्या. तीन पक्ष फिरुन येणारांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारायच्या असतात का? तसेच काहींनी सत्तेसाठी किती कोलांउड्या मारल्या हे गुगलवर जाऊन पाहिलं तरी कळेल, अशी टीका अजित पवार यांनी केली.

…तर मग अजित पवारांना बरोबर का घेता? आंबेडकरांचा नैतिकतेवरुन खडा सवाल

रोहित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले काहीजण स्वत:ला मोठं समजायला लागलेत. पण आम्ही विकासाला साथ देणारी माणसं आहेत. अतुल बेनके बोलले त्यात काय चुकलं, तुमच्या मतदारासंघाचा घास कोणी काढून घेत असेल तर तिथल्या आमदारांनी गप्प बसायचं का? बघ्याची भूमिका घ्यायची? असा सवाल अजित पवार यांनी केला. पण काहीजण वेगळ्या प्रकारच्या वलग्ना करत आहेत. मात्र त्यांच खरं दुखणं वेगळं आहे, असा टोला अजित पवार यांनी रोहित पवार यांना लागवला.

जानकारांना सोबत घेणार, माढा सोडणार… पवार-ठाकरे साधणार पाच समीकरणे

दरम्यान, आमदार रोहित पवार आणि अतुल बेनके यांच्यात जुन्नरच पाणी कर्जत-जामखेडला वळवल्यावरुन वाद सुरु आहे. यावरुन अतुल बेनके यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली होती.

चंद्रकांत पाटलांनी छाती ठोकपणे सांगितले, ‘महादेव जानकर कुठेच जाणार नाही…’

follow us