चंद्रकांत पाटलांनी छाती ठोकपणे सांगितले, ‘महादेव जानकर कुठेच जाणार नाही…’

चंद्रकांत पाटलांनी छाती ठोकपणे सांगितले, ‘महादेव जानकर कुठेच जाणार नाही…’

Chandrakant Patil on Mahadev Jankar : रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीच्या बैठकांना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन केले होते. मधल्या काळात शरद पवार यांनी त्यांना माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर देखील दिली होती. यावरुन महाविकास आघाडीसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महादेव हे महायुतीसोबत असून ते कुठेही जाणार नाहीत हे छाती ठोकपणे सांगते, असे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस आणि महादेव जानकर जिवलग मित्र आहेत. पंकजा ताई त्यांची बहीण आहेत. त्यामुळे महादेव जानकर यांच्या मनात जे काही प्रश्न निर्माण झाले, ते सोडविण्यास दोघेही सक्षम आहेत. एकदा माझे समाधान होऊ द्या आणि मग बैठकीला बोलवा. अशी भूमिका त्यांची भूमिका आहे. त्यांचे म्हणणे बरोबर आहे. ते कुठेही गेले नाहीत आणि जाणारही नाहीत, चंद्रकांत पाटील म्हणाले.

जरांगे यांच्या चौकशीसाठी SIT : फडणवीस 2019 ची चूक पुन्हा करतायेत?

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची चाचपणी करत आहेत. दरम्यान, भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, महायुतीच्या वतीने राज्यभर बैठकाही सुरू झाल्या आहेत. त्या बैठकांना कोणत्याही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जाऊ नये, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले होते.

इंदापूर, दौंड अन् पुरंदरचे वाद… अजितदादांच्या मदतीला चंद्रकांतदादा सरसावले…

या सर्व घडामोडींमध्ये भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube