…तर आपणाला कधीच माफ करणार नाही, आव्हाडांचे प्रकाश आंबेडकरांना खुलं पत्र

…तर आपणाला कधीच माफ करणार नाही, आव्हाडांचे प्रकाश आंबेडकरांना खुलं पत्र

Jitendra Awhad’s letter to Prakash Ambedkar : महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नाही. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांना वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं होतं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार की नाही यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहेत. अशात आंबेडकरांनी प्रचार सभांचा धडाकाही सुरु केला आहे. यावरुन आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रकाश आंबेडकरांना जाहीर पत्र लिहिले आहे.

आव्हाडांनी पत्रात काय म्हटलंय?
मी शिव, फुले, शाहू , आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार- प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नेते म्हणून आपणांकडे पाहिले जात आहे.

चूक झाली म्हणता तर गुपचूप भेटून दहा-दहा वेळा निरोप का पाठवले? अमोल कोल्हेंचा खोचक सवाल

त्यांनी पुढं लिहिले की आपणांकडे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करू इच्छितो की, तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे; अन् त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तरी तयार आहे. आपणही याच विचारांचे आहात. संविधान आणि लोकशाही हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया!

जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम

इंदापूर, दौंड अन् पुरंदरचे वाद… अजितदादांच्या मदतीला चंद्रकांतदादा सरसावले…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube