चूक झाली म्हणता तर गुपचूप भेटून दहा-दहा वेळा निरोप का पाठवले? अमोल कोल्हेंचा खोचक सवाल

चूक झाली म्हणता तर गुपचूप भेटून दहा-दहा वेळा निरोप का पाठवले? अमोल कोल्हेंचा खोचक सवाल

Amol Kolhe on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. यावेळी अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमोल कोल्हे सारख्या सेलिब्रिटीला उमेदवारी देऊन मी चूक केल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांनी मला गुपचूप भेटून दहा दहा वेळा निरोप पाठवल्याचा गौप्यस्फोट कोल्हे यांनी केला आहे.

अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे हे देखील खासदार आहेत. पण लोकसभेतील माझी कामगिरी त्यांच्यापेक्षा चांगली आहे. मी 2019 मध्ये काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे स्वत: अजित पवार यांनी कौतुक केले. मी सेलिब्रिटी उमेदवार आहे आणि मतदारसंघात काम केलं नाही तर अजित पवारांनी मी पक्षात यावं म्हणून मला गुपचूप भेटून दहा दहा वेळा निरोप का पाठवले? असा खोचक सवाल करत अमोल कोल्हे यांनी विचारला आहे.

शरद पवार यांनी मला दिलेल्या संधीशी प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी संसदेतील माझी कामगिरी लोकांसमोर ठेवली आहे. मी जी भूमिका बजावली आहे त्यावर मी ठाम आहे आणि यापुढेही असेच म्हणतो. ” असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

भुसेंच्या हस्ते लोकार्पण होताच भुजबळ नाराज? छगन भुजबळांनी डाव सावरला

अजित पवार यांनी काय म्हटले होते?
अमोल कोल्हेंना मतदान करा म्हणून तुमच्याकडे विनंती करायला मी यायचो. मला वाटलं वत्कृत्व चांगलं आहे. दिसायला राजबिंडा आहे. चांगलं काम करतील. पण दोन वर्षानंतर ते म्हणायला लागले दादा मला राजीनामा द्यायचा. मी म्हटले लोकांनी तुम्हाला पाच वर्षांसाठी निवडून दिले. असा मध्येच राजीनामा दिला. तर लोक जोड्याने मारतील आपल्याला. ते म्हणाले, मी कलावंत आहे. माझे नाटक, चित्रपट, मालिका असतात. त्यावर परिणाम होतो. तेव्हा मी त्यांना सांगितलं हे बरोबर नाही. असं करू नका. त्यावर ते म्हटले की, मी सेलिब्रेटी आहे. लोकांना मी मतदार संघात यावं वाटतं. पण यामुळे माझ्या व्यवसायावर परिणाम होतो.

‘एअरहोस्टेस विनयभंग’ प्रकरणी खुलासा करणार का? लोंढेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल

पुढे अजित पवार म्हणाले, मला बाकी सर्वजण म्हणायचे की, तूच त्यांना पक्षात आणले. तर तूच त्यांना समजावून सांग. त्यामुळे अमोल कोल्हे यांचा राजकारण पिंडच नाही. आम्ही राजकारणी लोक एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर सेलिब्रेटी काढतो. अशी कबुली अजित पवारांनी दिली.
वंचित मविआत येणार की नाही? राऊत म्हणाले, आंबेडकर हे मायावतींसारखं….

follow us
  • fb
  • instagram
  • youtube