वंचित मविआत येणार की नाही? राऊत म्हणाले, आंबेडकर हे मायावतींसारखं….

वंचित मविआत येणार की नाही? राऊत म्हणाले, आंबेडकर हे मायावतींसारखं….

Sanjay Raut : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Alliance) पक्ष महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामील झाला असला तरी अद्याप मविआतील नेते आणि आंबेडकरांचा ताळमेळ बसतांना दिसत नाही. कारण, जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच आंबेडकरांनीनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना मविआच्या बेठका किंवा कार्यक्रमात सहभागी न होण्याचं आवाहन केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)यावर भाष्य केलं.

Saqib Saleem: साकिब सलीमच्या इंस्टाग्राम पोस्टनं चाहत्यांना केलं मोहित 

प्रकाश आंबेडकर हे मायावतींसारखे नाहीत. मोदींना मदत होईल अशी कुठलीच कृती ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे करणार नाहीत, असं राऊत म्हणाले.

संजय राऊतांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, आंबेडकर सन्मानीय नेते आहेत. आमचा त्यांच्याशी खूप चांगला संवाद आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवा, कार्यकर्त्यांना उमेदवा मिळावी यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, आम्हीही करतो. तेही करतात. पण हुकूमशाहीविरुद्ध लढण्याबाबत आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह मविआचे सर्व नेत्यांचं यावर एकमत आहे. महाराष्ट्र आणि देशाला हुकूमशाहीपासून मुक्त करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे

अरे हो की बाबा झाली चूक हा दिवटा…; घोडगंगावरून अजितदादांनी घेतला अशोक पवारांचा समाचार 

राऊत म्हणाले, मोदी सरकारच्या काळात देशातील लोकशाही आणि संविधान पायदळी तुडवले जात आहे. आपण ते जतन केले पाहिजे. संविधानावर पाय ठेवणाऱ्यांचे पाय खेतून त्यांना खाली पाडायचे आहे. त्यासाठी सर्वांच्या एकीची वज्रमुठ असणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही दोन दिवासांनी 6 तारखेला एकत्र बसून चर्चा करणार आहोत. प्रकाश आंबेडकरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. मला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रीय प्रवाहात सहभागी असल्याने ते पूर्णपणे देशाच्या जनमाणसाचा अंदाज घेऊन इंडिया आघाडी आणि मविआसोबत राहतील, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

प्रकाश आंबेडकर मायावतींसारखे काही करणार नाहीत. मायावतींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोप आहे. पण प्रकाश आंबेडकर मोदींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मदत करणारे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत, असा आमचा विश्वास आहे. नरेंद्र मोदी सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास नाही. मोदींच्या राज्यात आंबेडकरांच्या विचारसरणीची उपेक्षा झाली आहे, अशी टीकाही राऊतांनी केली.

मोदी शेतकऱ्यांसाठी डेथ वॉरंट काढताहेत
राऊत यांनी यावेळी मोदींवरही टीका केली. ते म्हणाले, दिल्ली ही देशाची राजधानी आहे. देशातील त्रस्त शेतकरी, बेरोजगार, मजूर यांनी सरकारकडे न्याय मागितला नाही तर जाणार कुठे? इंग्रजांच्या काळातही न्यायालय असायचे, पण मोदींच्या काळात न्याय मागण्यासाठी त्यांना राजधानीत येण्याची परवानगी नाही,

तसेच २०१४ पासून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल आणि एकही आत्महत्या होणार नाही, अशी मोदींची गॅंरंटी होती. मात्र हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना गॅंरटी देणारे मोदीच आज शेतकऱ्यांसाठी डेथ वॉरंट काढत आहेत, अशी टीका राऊतांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube