भुसेंच्या हस्ते लोकार्पण होताच भुजबळ नाराज? छगन भुजबळांनी डाव सावरला

भुसेंच्या हस्ते लोकार्पण होताच भुजबळ नाराज? छगन भुजबळांनी डाव सावरला

Chagan Bhujbal News : नाशिकमध्ये आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महायुतीच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी समृद्धी महामार्गाच लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते झालं. त्यानंतर कार्यक्रमस्थळीच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) नाराज झाल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, छगन भुजबळांनी भाषणात बोलताना नाराजीवर थेटपणे भाष्य केलं आहे.

बैठक बोलावली पण पदाधिकाऱ्यांची दांडी, राज ठाकरे पुण्यातून बैठक न घेताच माघारी परतले

छगन भुजबळ म्हणाले, मी अजितबात कोणावरही नाराज नाही. मी कार्यक्रमाच्या ठिकाणी 11 वाजण्याऐवजी 10 : 45 वाजता आलो होतो. त्यामुळे काही थोडा गैरसमज झाला असल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं आहे. तसेच यावेळी बोलताना भुजबळांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही उल्लेख केला आहे. गडकरी नाशिकमध्ये आले तेव्हा सांगितलं होतं, नाशिक-मुंबई सिमेंट काँक्रिट रस्ता करणार आहोत. एमएसआरडीसीने हे काम लवकरात करावं असं वाटत असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत.

Manoj Jarange बोलवता धनी कोण? हे शोधणे गरजेचे, आंदोलनावरून विखेंनी व्यक्त केला संशय

तसेच नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात 24.872 किलोमीटर लांबीचा एकूण 16 गावातून समृद्धी महामार्ग जाणार आहे. त्यासाठी पॅकेज 13 अंतर्गत 23.251 किलोमीटरचा आणि 14 अंतर्गत 1.621 किलोमीटर लांबीचा समावेश आहे. समृद्धी महामार्गामुळे कुठे जायचं असल तर समृद्धी महामार्ग उत्तम पर्याय असून सध्याच्या घडीला इगतपुरी ते आमने पर्यंतचे काम प्रगतिपथावर आहे. पुढचे काम पूर्ण झाल्यानंतर 70 टक्के वाहतूक समृद्धीनेचे होईल. सोबतच सध्या नाशिक ते मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या देखील या महामार्गामुळे सूटणार असल्याचंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमात महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. कार्यक्रमात मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण झाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा असल्याचं दिसून येत होतं. त्यावरुन छगन भुजबळांनी थेट भाष्य करीत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube