बैठक बोलावली पण पदाधिकाऱ्यांची दांडी, राज ठाकरे पुण्यातून बैठक न घेताच माघारी परतले
Raj Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी (३) दुपारी पुण्यातील पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती. मात्र, अनेक पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक सुरू होऊ शकली नाही. त्यामुळं संतापलेल्या राज ठाकरेंनी तडकाफडकी पक्ष कार्यालय सोडून मुंबईच्या दिशेने प्रयाण केलं. त्यामुळं मनसे कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
आधी भ्रष्टाचारी मंडळींवर आरोप करायचे, मग निर्लज्जपणे…; सामना अग्रलेखातून फडणवीसांवर टीकास्त्र
पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाखाप्रमुखांपासून आयोजकांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला पाठवण्यात आलं होतं. दुपारी दोनच्या सुमारास राज ठाकरे नवी पेठेतील पक्ष कार्यालयात पोहोचले होते.. त्यावेळी काही राज्यस्तरीय अधिकारी वगळता अन्य स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी बैठकीला आले नव्हते. राज ठाकरे यांनी काही वेळ वाट पाहिली, मात्र दुपारी अडीच वाजून गेल्यानंतरही बैठक सुरू झाली नाही.
मोदी सद्रुमाच्या तळाशी जातात, पण मणिपूरला जात नाही; ठाकरेंची कडाडून टीका
दुसरीकडे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी पक्ष कार्यालयाबाहेर माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, ‘मला मीडियाशी बोलायचे नाही,’ असा निरोप राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत पाठवला.
बैठक सुरू न झाल्याने राज ठाकरे संतापले. मीटिंग वेळेवर सुरू करायची नव्हती तर मला इथे का बोलावलं? असा जाब त्यांनी पदाधिकाऱ्यांना विचारत करून पक्ष कार्यालय सोडले. त्यानंतर ते थेट मुंबईला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, असं काही घडले नाही. राज ठाकरे यांनी पक्ष संघटक आणि उपसंघटकांकडून लोकसभा निवडणुकीची माहिती घेतली. यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना बैठका घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दिवसभर आठही विभागांच्या बैठका झाल्या असून त्याचा तपशील राज ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी सांगितले.