बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ! पूरपरिस्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Maharashtra HSC Board Exam: Maharashtra HSC Board Exam: विद्यार्थ्यांना परीक्षांचे अर्ज भरण्यास अनेक अडचणी येतायत. त्यामुळे 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय.

  • Written By: Published:
Maharashtra HSC Board Exam Extension of time to fill exam application till 20th October

Maharashtra HSC Board Exam: राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या (Maharashtra HSC Board Exam) विद्यार्थ्यांना परीक्षांचे अर्ज भरण्यास अनेक अडचणी येतायत. त्यामुळे 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतलाय. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याचे सूचना दिल्या होत्या. ( Maharashtra HSC Board Exam Extension of time to fill exam application till 20th October)

उद्या मंगळवारी संपणार होती मुदत
राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज भरण्याची 30 सप्टेंबरला शेवटची मुदत आहे. मात्र मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आणि राज्यात होत असलेली अतिवृष्टिमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी, पालकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.


नुकसानग्रस्तांना लवकर मदत नाही मिळाली तर आम्ही मंत्र्यांना… शशिकांत शिंदे यांचा थेट इशारा

त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षणमंत्री भुसे यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. शिक्षण मंत्र्यांनी लगेचच राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क करत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत 20 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला.


सीनाचं पाणी नागरिकांच्या घरात; निलेश लंकेनी अधिकारी व ठेकेदारांना धरलं धारेवर

बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्यांनाही दिलासा
यासंदर्भात शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आलीय. तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.


‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलली

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 28 सप्टेंबरला होणार होती. परंतु आता ही परीक्षा 9 नोव्हेंबरला होणार आहे. त्याचप्रमाणे आता बारावीची विद्यार्थ्यांना परीक्षांचे अर्ज भरण्याची मुदतही वाढविण्यात आली आहे.

follow us