SSC HSC Exam 2024: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

SSC HSC Exam 2024: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

SSC HSC Exam 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून SSC (10 वी) आणि HSC (12 वी) च्या परीक्षांचा वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहेत. HSC ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीमध्ये होणार आहे. तर, SSC ची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे.

फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत, याची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाने यावेळी दिली.

इयत्ता 10 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी, 2024 ते गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 व इयत्ता 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी, 2024 ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी, 2024 या कालावधीमध्ये वेळापत्रकनुसार घेण्यात येणार आहे.

ललित पाटीलच्या जीवाला धोका; वकिलाचा न्यालयात मोठा दावा, पोलीस कोठडी वाढ

तसेच छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेला यावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडिया माध्यमातून प्रसिद्ध झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

इयत्ता बारावी सर्वसाधारण, व्यवसाय व द्विलक्षी अभ्यासक्रम – दि. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च
माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा (इ. बारावी) – दि. 20 मार्च ते 23 मार्च
इयत्ता दहावी – दि. 1 मार्च ते 26 मार्च

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube