Board Exam : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षेला लेट आल्यास…
मुंबई : दहावी (SSC Exam) बारावी (HSC Exam) परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना वेळेतच परीक्षा केंद्रात (Exam Hall)उपस्थित राहावं लागणारंय. उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना (Students)प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचं बोर्डाच्या निदर्शनास आल्यानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान घेतली जाणारंय. सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता अशी पेपरची वेळ आहे. आत्तापर्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये 10 मिनिटं उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी दिली जात होती.
आता मात्र शिक्षण मंडळानं उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणं अनिवार्य आहे. या संदर्भातील पत्र देखील मंडळानं सर्व शाळांना पाठवलंय.
उशीरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचं निदर्शनास आलंय. याची मंडळानं दखल घेऊन कारवाई केली. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी बोर्डानं पत्रक जारी केलंय.
सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला वेळेच्या अगोदरच हजर राहण गरजेचं आहे. गैरप्रकारांवर प्रतिबंध घालण्यासाठी बोर्डानं हे पाऊल उचललंय. यापुढं परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात प्रवेश देता येणार नसल्याचं मंडळानं सांगितलंय.