Eknath Shinde : शिरसाट-मिसाळ वाद एकनाथ शिंदेंच्या कोर्टात, म्हणाले, “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या..”

Eknath Shinde Latest News : सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय खात्याच्या काही बैठकांचे आयोजन केल्यानंतर संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करत त्यावर लेखी स्वरूपात हरकत नोंदवली होती. इतकच काय तर पत्रातून यापुढे आपल्याकडील विषयासंबधित आपणास बैठक घ्यावयाची असल्यास सदर बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणे संयुक्तिक राहीलं असे नमूद केले होते. यावर मंत्री मिसाळ यांनीही प्रतिक्रिया दिली होती. दोन्ही मंत्र्यातील हा वाद आता राज्याचे उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) कोर्टात पोहोचला आहे. पत्रकारांनी याबाबत विचारले असता मी त्याबाबतीत तपासून घेतो असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले.
समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना एक पत्र लिहिले आहे. तुम्ही बैठका घेऊ नका असे या पत्रात म्हटले आहे. त्यावर मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे असे विचारले असता शिंदे म्हणाले मी त्या बाबतीत तपासून घेतो. आम्ही सगळे मंत्री एक टीम आहोत. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व काम करत आहोत. त्यामुळे या प्रकरणात माहिती घेऊन जे काही योग्य असेल ते होईल.
मिसाळांच्या खरमरीत पत्राचा कॅबिनेट मंत्र्यांना घरचा ‘आहेर’; ‘पुणेरी’ बाणा दिसताच शिरसाट नरमले
संजय राऊतांवर खरमरीत टीका
ज्याचं तोंड मिठी नदीतल्या गाळात गेलंय. जे गाळात रुतलेले आहेत. रस्त्यात आणि खड्ड्यात पैसे खाणारे लोक आहेत. हे कोविड काळातल्या खिचडीत चोरी करणारे लोक आहेत. लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत. त्यांनी काय आम्हाला शिकवावं. झारखंडमध्ये जो काही गुन्हा असेल घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि दूध का दूध पानी का पानी होईल. त्यामुळे जिनके घर शीशे के होते है दुसरे के घरोंपर पत्थर नहीं फेका करते. आम्ही स्वच्छ आहोत पण ह्यांना या मुंबईतल्या जनतेनं पाहिलं आहे. ह्यांनी गेली 25 वर्षे मुंबईला लुटलं आहे. ते आमच्यावर आरोप करताहेत हे खरंच दु्र्दैव आहे.
मिसाळ अन् शिरसाटांमध्ये नेमका मिठाचा खडा कसा पडला?
सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय खात्याच्या काही बैठकांचे आयोजन केल्यानंतर, संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करत त्यावर लेखी स्वरूपात हरकत नोंदवली होती. इतकच काय तर पत्रातून यापुढे आपल्याकडील विषयासंबधित आपणास बैठक घ्यावयाची असल्यास सदर बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणे संयुक्तिक राहीलं असे नुद केले होते. त्यानंतर मिसाळ यांनी थेट शिरसाटांना अधिकारांचा आरसा दाखवत खरमरीत भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, मिसाळांच्या पत्रानंतर आणि पुणेरी बाण्यानंतर शिरसाटांनी बॅकफूटवर जात नरमाईचा सूर घेतला आहे.
बैठकीसाठी तुमच्या पूर्वपरवानगीची गरज नाही – मिसाळ
शिरसाटांच्या अचानक आलेल्या पत्राबाबत बोलताना मिसाळ म्हणाल्या की, आमच्या दोघात वाद नाही. आमच्या दोघांमध्ये व्यवस्थित संवाद आहे. पण, अचानक पत्र का आले? ही माझ्यासाठी देखील आश्चर्याची गोष्ट होती. त्या पत्राला मी उत्तर दिले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसारच मी या बैठकांचे आयोजन केलं आहे. शिवाय, सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री म्हणून मला अशा बैठकांसाठी पूर्वपरवानगी घेण्याची गरज नाही,” असे मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्लीतही ‘रमी’ची चर्चा, खासदार विचारतात रमी खेळणारा मंत्री कोण? सुप्रिया सुळेंचा खोचक टोला