अपात्र आमदार प्रकरण शिवेसेनेसारखंच राष्ट्रवादीचंही? छगन भुजबळांचं मोठं विधान…
Chagan Bhujbal : शिवेसना अपात्र प्रकरणात व्हिपच्या मुद्द्यावर अनेक प्रश्न होते, मात्र राष्ट्रवादीत व्हिपचा मुद्दाच नाही. पूर्वीचा जो व्हिप होता तोच आत्ताही असल्याचं मोठं विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) केलं आहे. दरम्यान, अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. त्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेसारखंच राष्ट्रवादीचंही होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर बोलताना छगन भुजबळांनी भूमिका मांडली आहे.
नार्वेकरांच्या पाच चुका ठाकरे गटाने पकडल्या… याच मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात होणार खल!
छगन भुजबळ म्हणाले, अपात्र आमदार प्रकरणावर नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर दुसरी बाजू ही न्यायालयात जाणारच आहे. शिवसेना अपात्र आमदार प्रकरणात व्हिप कोण होता? आदेश कोणी दिले? याबाबतचे असंख्य प्रश्न होते. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रकरणात पूर्वीचा जो व्हिप आहे तोच व्हिप असल्याने दोन्ही प्रकरणांमध्ये मोठा फरक असल्याचंही छगन भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.
Ram Mandir उद्घाटनाकडे चारही शंकराचार्यांनी फिरवली पाठ; ‘या’ कारणामुळे अयोध्येला जाणार नाही
तसेच व्हिपची नेमणूक कोणी केली, आदेश योग्य की अयोग्य? नेमणूक योग्य आहे का? असेही असंख्य प्रश्न शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात होते. त्या बाबतीत आमची बाजू भक्कम असून आमचे व्हिप बदललेलेच नाही. तो भाग आमच्या केसमध्ये नाही, त्यामुळे शिवेसेनेसारखंच राष्ट्रवादीचंही असं नसल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.
Fighter Movie: IMDb द्वारे 2024 मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या भारतीय सिनेमांची घोषणा
राहुल नार्वेकर यांनी काल विधी मंडळात अपात्र आमदार प्रकरणी निकाल जाहीर केला आहे. नार्वेकर स्वत; वकील आहेत ते अभ्यासू आहेत. दोन्ही पक्षाचे आमदार अपात्र ठरलेले नाहीत. असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबबातच्या कायदेशीर लढाईला सुरुवात झाली असून राष्ट्रवादीच्या अपात्र आमदाराच्या प्रकरणाची ही सुनावणी शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर होणार आहे.
या प्रकरणात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी वेगवेगळे दावे केले आहेत. राष्ट्रवादीच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणीसाठी 12 दिवसांचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांसमोर ही सुनावणी होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी आज दोन्ही गटाला याचिकेसाठी अधिक माहिती देण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे.