Fighter Movie: IMDb द्वारे 2024 मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या भारतीय सिनेमांची घोषणा

Fighter Movie: IMDb द्वारे 2024 मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या भारतीय सिनेमांची घोषणा

Fighter Movie: प्रेक्षक हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या आगामी ‘फाइटर’ (Fighter Movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाचा टीझर आणि त्यातील गाण्यांना चाहत्यांची मोठी पसंती होती. आता प्रेक्षक फक्त त्याच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, या चित्रपटाने रिलीजपूर्वीच एक मोठा टप्पा गाठला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by IMDb India (@imdb_in)


‘फायटर’ रिलीजपूर्वी नंबर 1 झाला

IMDb ने 2024 च्या आगामी चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीत हृतिक आणि दीपिकाच्या फायटर या चित्रपटाला पहिले स्थान मिळाले आहे. या यादीत 11 चित्रपट आहेत, ज्यामध्ये सिद्धार्थ आनंदचा चित्रपट फायटर पहिल्या क्रमांकावर आहे. चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक झाले आहेत. या यादीत फायटर पहिल्या क्रमांकावर आहे, तर ‘पुष्पा 2’ला दुसरे आणि ‘वेलकम टू द जंगल’ला तिसरे स्थान मिळाले आहे.

‘फायटर’ या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्याशिवाय अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट आहे. चित्रपटातील सर्व पात्रे हवाई दलाच्या पायलटच्या भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला, यामध्ये हृतिक आणि दीपिकाची जबरदस्त एरियल अॅक्शन पाहायला मिळाली. पठाण आणि टायगरचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

Bade Mian Chote Mian: खिलाडी अन् टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ रिलीजच्या तयारीत!

‘या’ दिवशी हृतिक-दीपिकाचा चित्रपट प्रदर्शित होणार

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’चा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबद्दल सांगायचे तर हा चित्रपट प्रजासत्ताक दिनानिमित्त २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. भारतातील पहिल्या एरियल अॅक्शन फिल्मची निर्मिती Marflix Pictures ने Viacom 18 च्या सहकार्याने केली आहे. हा चित्रपट बँग बँग आणि वॉर नंतर हृतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंद यांच्या बॉक्स ऑफिसवरील यशस्वी भागीदारीतील तिसरा सहयोग आहे. ‘बचना ए हसीनो’ आणि ‘पठाण’ नंतर सिद्धार्थ आणि दीपिकाचा हा तिसरा चित्रपट आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज