Fighter Teaser: हृतिक-दीपिकाचा धमाका, ‘फायटर’चा उत्कंठावर्धक टीझर एकदा पाहाच

Fighter Teaser: हृतिक-दीपिकाचा धमाका, ‘फायटर’चा उत्कंठावर्धक टीझर एकदा पाहाच

Fighter Teaser Released: सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) बहुप्रतिक्षित ‘फायटर’ (Fighter Movie) या चित्रपटाबाबत बरीच चर्चा आहे. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan‘) या एरियल अॅक्शन चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Fighter Teaser ) चाहत्यांची उत्कंठावर्धक करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाच्या ‘हीर आसमानी’ या थीम साँगचा टीझर रिलीज केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)


‘हीर आसमानी’ या नव्या गाण्याचा टीझर रिलीज

उत्साह आणि उत्कटतेने भरलेल्या या गाण्याचा टीझर खूपच रंजक दिसत आहे, यामध्ये दीपिका आणि हृतिकची जादू पाहायला मिळते. देशभक्तीच्या उत्कटतेने भरलेले हे गाणे आपल्या देशाच्या सुरक्षेमध्ये गुंतलेल्या लढाऊ वैमानिकांना समर्पित आहे. या गाण्याचे पार्श्वसंगीत हे एक फुल ऑन दमदार गाणे असणार असल्याचे दिसून येते. 8 जानेवारीला निर्माते ‘हीर आसमानी’चे पूर्ण गाणे रिलीज करणार आहेत.

CM शिंदेंसमोर प्रशांत दामले म्हणाले, ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’

चित्रपटाची स्टार कास्ट

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट 25 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणशिवाय अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय आणि संजीदा सेख हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाची कथा भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांवर आधारित असून यामध्ये हृतिक स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानियाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ ​​मिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. अनिल कपूरबद्दल सांगायचे तर तो फायटरमध्ये कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube