CM शिंदेंसमोर प्रशांत दामले म्हणाले, ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan: अखिल भारतीय नाट्य संमेलन नाट्य परिषदेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नाट्य संमेलन नाट्य परिषदेत अनेक मराठी कलाकारांसह पिंपरी चिंचवडकरांनी देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भारतीय नाट्य संमेलन नाट्य परिषदेची (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) जोरदार चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत देखील याठिकाणी हजेरी लावली आहे. दरम्यान, नाट्य संमेलनाचे पहिल्यांदा अध्यक्षपद मिळाल्यानंतर अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रशांत दामले आनंद व्यक्त करताना म्हणाले, ‘मला मुख्यमंत्री…’
यावेळी प्रशांत दामले म्हणाले की, “नाट्यसंमेलन ही कलाकारांसाठी दिवाळी आहे. प्रत्येक कलाकार हा मनोरंजनसृष्टीतील विविध माध्यमावर काम करत असतो परंतु नाट्यसंमेलनानिमित्ताने विचारांचं आदान-प्रदान होतं. आम्ही कलाकार मंडळी तीन तास नाटकं करत असतो. पण 365 दिवस 24 तास अभिनय करणारी ही मंडळी देखील या मंचावर हजर आहेत. त्यांच्या कार्याला नक्कीच माझा सलाम. मात्र मला या नाट्य संमेलनाचे पहिल्यांदा अध्यक्षपद सल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटत आहे, असे यावेळी आनंद व्यक्त करताना म्हणाले.
Mumbai Culture Festival: 13 व 14 जानेवारीला मुंबई संस्कृती महोत्सव
प्रशांत दामले पुढे म्हणाले की, ” महाराष्ट्र शासनाने दिलेला निधी योग्यरीत्या आपण वापरायला हवा. शासनाने आम्हाला योग्य त्या उपाययोजना पुरवाव्यात. रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढीत नाटकाचा मोठा गोडवा निर्माण करावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाट्यगृह बांधणं आणि ती सांभाळणे सोपं राहणार आहे. अलीकडेच सांस्कृतिक मंत्री म्हणाले की,”आम्ही 70 नाट्यगृह बांधणार”, हे ऐकून मराठी कलाकार मंडळी आनंदी झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मात्र ती नाट्यगृह योग्यरीत्या व्यवस्थित ठेवायला हवी. नाट्यगृहाचे दर, लाईट बिल, सुविधांची वानवा आहे. यामध्ये सरकारने आवर्जून लक्ष घालावे. थेट महापालिका आयुक्तांसमोरचं प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट तक्रार केली आहे.