Bade Mian Chote Mian: खिलाडी अन् टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ रिलीजच्या तयारीत!

Bade Mian Chote Mian: खिलाडी अन् टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ रिलीजच्या तयारीत!

Bade Miyan Chote Miyan Releasing: बॉलीवूडचा (Bollywood) तरुण अॅक्शन सुपरस्टार म्हणजे टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा त्याच्या 2024 मधल्या पहिल्या रिलीजसाठी सज्ज होत असून 2024 च्या ईदला रिलीज होणार्‍या “बडे मियाँ छोटे मियाँ” मध्ये (Bade Miyan Chote Miyan) अक्षय कुमारसह (Akshay Kumar) तो मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चमक दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाभोवतीची अपेक्षा चाहत्यांना खूप आहे. चाहत्यांना पुन्हा एकदा “टायगर इफेक्ट” बघायचा असून ते त्यासाठी उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


या सिनेमातील डायनॅमिक अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर ही खास पोस्ट शेयर केली असून त्याला हटके कॅप्शन देखील दिलं आहे. जसजशी सिनेमाच्या रिलीजची तारीख जवळ येत आहे, तशी प्रेक्षकांना या बद्दलची उत्सुकता लागली आहे. बॉलिवूडचा तरुण अॅक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ हा नव्या रुपात सगळ्यांना यातून दिसणार आहे. यंदाची ईद ही एका सणापेक्षा मोठी होणार आहे.

टायगरच्या सिनेमॅटिक शैलीची झलक अनुभवण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत. आगामी काळात टायगर रोहित शेट्टीचा सिंघम अगेन आणि सिद्धार्थ आनंदचा मार्फ्लिक्स पिक्चर्सचा रॅम्बो मध्ये दिसणार असून त्याच दिग्दर्शन रोहित धवन करणार आहेत. “बडे मियाँ छोटे मियाँ” टाइगर सज्ज होत टायगर इफेक्टचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षक सज्ज होताना दिसतात.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा सिनेमा जॅकी भगनानीच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनत आहे. 300 कोटींच्या मेगा बजेट सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अली अब्बास जफरवर (Ali Abbas Jafar) यांनी सांभाळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अली अब्बासला दोन अ‍ॅक्शन सुपरस्टार्ससोबत सिनेमा बनवायचा होता. त्यामुळे आता त्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसत असून तो सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. अली अब्बास जफर पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील दोन अभिनेत्यांचे दिग्दर्शन करताना दिसणार आहे.

Nakhrewali: आनंद एल राय यांच्या ‘नखरेवाली’ सिनेमाचे शुटिंग पूर्ण, पडद्यावर झळकणार हे नवे चेहरे

सिनेमाचे बजेट 300 कोटी असल्याचे सांगितले जात आहे, बहुतेक बजेट कलाकारांच्या फीवर खर्च केले जाणार आहे. अली अब्बास जफर या सिनेमावर बजेटमधील फक्त 100 कोटी खर्च करणार आहे. बॉलीवूडमध्ये दोन अ‍ॅक्शन हिरोंचे सिनेमा क्वचितच बनतात कारण दोन स्टार्सची फी बजेटच्या सर्व मर्यादा पलीकडे जात आहे. टायगर चा आगामी सिनेमा “बडे मियाँ छोटे मियाँ” चे निर्माते प्रजासत्ताक दिन 2024 च्या शनिवार व रविवार दरम्यान चित्रपटाचा डायनॅमिक ट्रेलर रिलीज करणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube