Deepika Padukone: वयाच्या 38 व्या वर्षीही ‘दीपिका’ एकदम फिट; जाणून घ्या रहस्य

Deepika Padukone: वयाच्या 38 व्या वर्षीही ‘दीपिका’ एकदम फिट; जाणून घ्या रहस्य

Happy Birthday Deepika Padukone: बॉलिवूडची लेडी स्टार म्हटली जाणारी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2008 मध्ये ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om) या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या दीपिका पदुकोणने 16 वर्षे इंडस्ट्रीत खूप मोठा पल्ला गाठला आहे. (Deepika Padukone Diet ) पण फिटनेसच्या बाबतीत ती आजही पूर्वीसारखीच फिट दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)


दीपिका पदुकोण दिवसातून 6 वेळा जेवते: जेवणाची शौकीन असूनही दीपिका स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त आणि निरोगी ठेवते. दीपिकासारखी बॉडी मिळवायची असेल तर दीपिकाचा डाएट प्लॅन आणि फिटनेस रूटीनबद्दल नक्की जाणून घ्या.

नाश्ता: फिटनेस फ्रीक दीपिका पदुकोण दिवसातून सहा वेळा जेवत करते. कोमट पाणी आणि लिंबू मिसळून दीपिका दिवसाची सुरुवात करते. यानंतर, ती नाश्तासाठी 2 इडली किंवा साधा डोसा किंवा उपमा 2 अंडी आणि 2 बदाम घेते. शिवाय छपाक अभिनेत्री दररोज 1 कप लो फॅट दूध देखील घेते.

दुपारचे जेवण: दुपारच्या जेवणात दीपिकाला घरगुती पद्धतीचे साधे पदार्थ खायला आवडतात, ज्यात प्रथिने भरपूर असतात. ती रोज डाळ, रोटी, भाजी घेते. सोबत ती दहीही घेते. हे सर्व शरीराला लागेल तेवढेच घेते. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी, दीपिकाला फळांचे ताजे रस, नारळाचे पाणी किंवा स्मूदी पिणे आवडते.

खाद्यपदार्थ: दीपिकाचा संध्याकाळचा नाश्ता देखील खूप आरोग्यदायी आहे. बदामासोबत ती काजू देखील खात असते. शिवाय अभिनेत्रीलाही फिल्टर कॉफी घेणे देखील खूप आवडते.

कतरिना कैफच्या मेरी ख्रिसमसमधील ‘नजर तेरी तुफान’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

रात्रीचे जेवण: दीपिका तिचे डिनर खूप हलके करते. रात्रीच्या जेवणात ती दोन रोट्या, हिरव्या भाज्या आणि कोशिंबीर घेते आणि त्यासोबत ती फळेही खात असते.

दीपिकाला जेवणाची आवड आहे, हे सर्वांना माहीत आहे. तिचे सोशल मीडियावर खूप हटके अंदाजात फोटो बघायला मिळत असतात. तिला मिठाईमध्ये चॉकलेट खायला आवडते. निरोगी आहारासोबतच दीपिका भरपूर व्यायामही करते. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दीपिका रोज योगा आणि व्यायाम करत असते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज