Project K मधील Deepika Padukone चा फर्स्ट लूक समोर

Project K मधील Deepika Padukone चा फर्स्ट लूक समोर

Deepika Padukone First Look Out: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) ‘प्रोजेक्ट के’ (Project K) या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे. आता या बहुचर्चित सिनेमातील बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. निर्मात्यांनी मध्यरात्री दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. ‘प्रोजेक्ट के’च्या (Project K Deepika Padukone First Look) निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत दीपिकाचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)


सोशल मीडियावर (Social media) सध्या दीपिकाचा हा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘प्रोजेक्ट के’मधील दीपिकाच्या लूकने चाहत्यांसह नेटकऱ्यांचं चांगलंच लक्ष वेधून घेत आहे. दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या लूकमध्ये दीपिका पादुकोणने काळ्या रंगाच्या ड्रेस परिधान केल्याचे दिसून येत आहे. तसेच या पोस्टवर सिनेमाची रिलीज डेट देखील लिहिण्यात आली आहे.

दीपिकाचा फर्स्ट लूक चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. दीपिकाच्या या लूकवर हा सिनेमा सुपरहिट होणार अशा प्रतिक्रिया चाहते करत असल्याचे दिसत आहे. ‘प्रोजेक्ट के’ या सिनेमात प्रभास (Prabhas) आणि दीपिका पादुकोणसह (Deepika Padukone), अमिताभ बच्चन म्हणजेच बिग बी, कमल हासन आणि दिशा पटानी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. कमल हासन या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे सांगितले जात आहेत.

Sindhutai Mazi Mai: छोट्या पडद्यावर पाहता येणार माईंचा जीवनप्रवास; “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” प्रोमो समोर

या तगडी स्टारकास्ट असलेल्या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. नाग अश्विनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘प्रोजेक्ट के’च्या शूटिंगच्या दरम्यान बिग बी जखमी झाल्याचे दिसून आले आहेत. यानंतर काही दिवस ब्रेक घेतल्यावर त्यांनी शो मस्ट गो ऑन म्हणत पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केली आहे.

‘प्रोजेक्ट के’ (Project K) हा हटके सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळ, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. सॅन दिएगो कॉमिक-कॉन (SDCC) २०२३ मध्ये प्रदर्शित होणारा ‘प्रोजेक्ट के’ हा पहिला भारतीय सिनेमा ठरणार आहे. ‘प्रोजेक्ट के’ हा वैजयंती मूव्हीज निर्मित सिनेमा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube